मावशी बरोबर लग्न करण्यासाठी भाच्याचे अपहरण

By Admin | Updated: September 20, 2016 13:20 IST2016-09-20T13:20:40+5:302016-09-20T13:20:40+5:30

एकतर्फी प्रेमातून युवतीला लग्नाला भाग पाडण्यासाठी आरोपीने युवतीच्या सहावर्षाच्या भाच्याचे अपहरण केल्याची घटना दिल्लीमध्ये घडली.

Kidnapping of a child to marry with a mother | मावशी बरोबर लग्न करण्यासाठी भाच्याचे अपहरण

मावशी बरोबर लग्न करण्यासाठी भाच्याचे अपहरण

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २० - एकतर्फी प्रेमातून युवतीला लग्नाला भाग पाडण्यासाठी आरोपीने युवतीच्या सहावर्षाच्या भाच्याचे अपहरण केल्याची घटना दिल्लीमध्ये घडली. पिंटू कुमार असे आरोपीचे नाव असून रविवारी त्याला अटक झाली. लग्नाला होकार दिला नाही तर, त्याने मुलाची हत्या करण्याची धमकी दिली होती.  
 
बिहार भागलपूरमध्ये एका विवाह सोहळयात पिंटू कुमारची युवतीबरोबर ओळख झाली. तरुणीपर्यंत पोहोचण्यासाठी त्याने ज्या मुलाचे अपहरण केले त्याच्या  वडिलांबरोबर ओळख वाढवली. युवती तिची बहिण आणि भाऊजींबरोबर दिल्लीला गेल्यानंतर पिंटू कुमारही दिल्लीला रहायला गेला. तिथे जाऊन त्याने युवतीच्या बहिणीला भेटून लग्नाचा प्रस्ताव मांडला. 
 
पण पिंटू कुमार बेरोजगार असल्याने त्यांनी लग्नाचा प्रस्ताव धुडकावून लावला. त्यामुळे चिडलेल्या पिंटू कुमारने लग्नाला होकार मिळवण्यासाठी युवतीच्या भाच्याचे अपहरण केले. पश्चिम दिल्लीत मुंडका भागातून त्याने मुलाचे अपहरण केले. मुलाला घेऊन तो बिहारच्या शिखपुरा भागात घेऊन गेला.
 
अपहरणाची तक्रार नोंदवल्यानंतर दिल्ली पोलिसांनी टीम्स बनवल्या. टेक्निकल सर्विलियन्सवरुन पोलिस आरोपीपर्यंत पोहोचले. रविवारी त्यांनी आरोपीला अटक करुन मुलाची सुटका केली. 
 

Web Title: Kidnapping of a child to marry with a mother