शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

केरळ : सोने तस्करीची मुख्यमंत्र्यांना होती माहिती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2021 04:58 IST

आरोपीच्या जबाबातून स्पष्ट, कस्टम्स विभागाचा कोर्टात दावा

तिरुवनंतपुरम : अरब अमिरातीतील वाणिज्य दूतावासाच्या मदतीने केरळमध्ये जे सोने स्मगलिंगने आले, त्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि अन्य तीन मंत्र्यांना होती, असा दावा कस्टम्स विभागाने एका आरोपीच्या जबाबाच्या आधारे शुक्रवारी केरळ उच्च न्यायालयात केला. 

प्रचार सुरू असतानाच हे सारे समाेर आल्याने राज्यातील डाव्या आघाडीला मोठाच धक्का बसला आहे. हे आरोप पूर्णत: खोटे असून, भाजप व केंद्र सरकार मुद्दाम ऐन निवडणुकीच्या काळात तपास यंत्रणांमार्फत मुख्यमंत्री व राज्य सरकारला बदनाम करीत आहे, असा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केला आहे. दुसरीकडे विजयन यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे, तर इतके गंभीर आरोप झाल्यानंतरही विजयन मुख्यमंत्रीपद सोडत नसल्याची टीका भाजपने केली आहे. विधानसभेच्या निवडणुकाही याच मुद्द्यावर लढवल्या जातील, असे दिसत आहे. 

आरोपीला तुरुंगात हवे संरक्षणशिवशंकर सध्या जामिनावर असून, त्यांचा जामीन रद्द करावा, अशी विनंती कस्टम्स विभागाने आज न्यायालयात केली. त्यावर शिवशंकर यांना त्यांचे म्हणणे सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. स्वप्ना सुरेश तुरुंगात असून, तिथे आपणास संरक्षण मिळावे, असा अर्ज तिने केला आहे.या खटल्यातील आरोपी स्वप्ना सुरेश या महिलेने दिलेल्या जबाबात यांची नावे घेतली आहेत. स्वप्ना सुरेश  हिने मुख्यमंत्री, राज्यातील तीन मंत्री व विधानसभेचे अध्यक्ष यांचा या स्मगलिंगशी संबंध असल्याचे जबाबात म्हटले आहे. या प्रकरणात अनेक बड्यांचा हात होता आणि काही बड्या मंडळींना लाच देण्यात आली, असे आरोपी महिलेने सांगितल्याची माहिती कस्टम्स विभागाच्या प्रतिज्ञापत्रात आहे. 

टॅग्स :GoldसोनंKeralaकेरळ