शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

Breaking : केरळमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला भीषण अपघात; १४ जणांचा मृत्यू, १२३ जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2020 21:08 IST

दुबईवरून केरळमधल्या करीपूर विमानतळावर लँडिंग होत असताना धावपट्टीवर विमान दुर्घटनाग्रस्त झालं

तिरुअनंतपूरमः केरळमधील कोझिकोड येथील करीपूर विमानतळावर शुक्रवारी एअर इंडिया एक्सप्रेसचं विमान दुर्घटनाग्रस्त झालं आहे. दुबईवरून केरळमधल्या करीपूर विमानतळावर लँडिंग होत असताना धावपट्टीवर विमान घसरलं, त्या विमानात 190हून अधिक प्रवासी होते. दुबई-कोझिकोड बोईंग 737 या विमानात 191 प्रवासी होते आणि ते संध्याकाळी 7:41 वाजता विमानतळावर दाखल झाले. एअरलाइन्सच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धावपट्टीवर विमानानं ओव्हरशॉट केल्याचे दिसून आले. या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 123 जण जखमी झाले असून 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. कोझिकोडमधील करीपूर विमानतळावर एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान लँडिंगच्या वेळी धावपट्टीवर घसरले. हे विमान दुबईहून प्रवासी घेऊन जात होते. या विमानात 191हून प्रवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. विमान कसं घसरलं याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. वंदे भारत अभियानांतर्गत एअर इंडिया एक्स्प्रेसचं IX-1344 विमान प्रवासी घेऊन येत होते. 

अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. घटनास्थळी गोंधळाचं वातावरण आहे. विमानाच्या पुढच्या भागाचं मोठं नुकसान झालं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना करीपूर विमानतळावर सायंकाळी 7.45 वाजता घडली. एअर इंडिया एक्स्प्रेसच्या म्हणण्यानुसार, दोन वैमानिकांसह सहा क्रू मेंबर्स विमानात होते. विमान अपघातग्रस्त झालं, तेव्हा त्यात 191 प्रवासी होते. विमान अपघातात जखमी झालेल्या अनेक प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. अपघातानंतर विमानाच्या पुढच्या भागाचे दोन तुकडे झाले. डीजीसीएने घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाKeralaकेरळ