शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

केजरीवाल यांना विनोद कुमार बिन्नींचे आव्हान

By admin | Updated: November 10, 2014 14:12 IST

दिल्लीत पुन्हा विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असतानाच आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर पक्षातील दोन आमदारांनीच जोरदार टीका करत आपची डोकेदुखी वाढवली आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १० - दिल्लीत पुन्हा विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असतानाच आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना स्वपक्षातील दोन आमदारांनीच आव्हान दिले आहे. दिल्लीच्या जनतेची दिशाभूल करणा-यांचा पर्दाफाश करु असे सांगत आपमधील बंडखोर आमदार विनोदकुमार बिन्नी यांनी अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. तर विद्यमान आमदान मनिंदर सिंग धीर यांनीदेखील आपमध्ये लोकशाही राहिली नाही अशी टीका केली आहे. 
विधानसभा बरखास्त झाल्याने दिल्लीत पुन्हा नव्याने विधानसभा निवडणुका घेतल्या जाणार आहेत. यंदा बहुमत मिळवण्याच्या इराद्याने आम आदमी पक्ष मैदानात उतरला असला तरी पक्षाचे विद्यमान आमदारच पक्षावर टीका करताना दिसत आहेत. आपच्या तिकीटावर निवडून आलेले पण सध्या पक्षातील बंडखोर आमदार विनोद कुमार बिन्नी यांनी थेट केजरीवाल यांच्याविरोधातच निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केली आहे. तर जंगपूरा येथील आमदार मनिंदर सिंग धीर यांनीदेखील आपवर टीका केली. आपमध्ये लोकशाही अस्तित्ताव राहिली नाही अशी टीका करतानाच धीर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचे भरभरुन कौतुक केले आहे. 
मनिंदर सिंग धीर यांना आपने पुन्हा उमेदवारी नाकारल्याने ते नाराज आहेत. आप सरकारच्या काळात दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष असलेले धीर यांनी विधानसभेचे कामकाज सक्षमपणे सांभाळले नव्हते व त्यामुळे आपचे नेतृत्व धीर यांच्या कामकाजावर नाखूष असल्याची चर्चा आहे. मात्र दोन विद्यमान आमदारांनी टीकास्त्र सोडल्याने केजरीवाल यांच्या समोरील आव्हान वाढले आहे.