जम्मू-काश्मिरातील शांतता अबाधित राखा

By Admin | Updated: January 16, 2015 05:07 IST2015-01-16T05:07:45+5:302015-01-16T05:07:45+5:30

दहशतवादाने पोळलेल्या जम्मू-काश्मिरात मोठी किंमत चुकवून शांतता नांदते आहे़ शांतता कायम ठेवणे ही आपली जबाबदारी आ

Keep peace in Jammu and Kashmir | जम्मू-काश्मिरातील शांतता अबाधित राखा

जम्मू-काश्मिरातील शांतता अबाधित राखा

नवी दिल्ली : दहशतवादाने पोळलेल्या जम्मू-काश्मिरात मोठी किंमत चुकवून शांतता नांदते आहे़ शांतता कायम ठेवणे ही आपली जबाबदारी आहे़ सोबत भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाच्या तयारीवरही आपली करडी नजर असली पाहिजे, असे लष्करप्रमुख जनरल दलबीर सिंह गुरुवारी जवानांना संबोधित करताना म्हणाले़ भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाला पाकचा पाठिंबा असल्याच्या आरोपाचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला़
येथे आयोजित ६७ व्या लष्कर दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते़ सरलेले वर्ष लष्करासाठी आव्हानात्मक ठरले़ मात्र, लष्कराने सीमेवरील शत्रूंच्या कारवाया हाणून पाडल्या़ जम्मू-काश्मिरातील जनतेचा सुरक्षा दलांवरील विश्वास वाढला आहे़ राज्यातील ताज्या विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्स्फूर्त सहभाग, हा त्याचा परिपाक आहे़ भविष्यात संगणकीय युद्धाचे आव्हान लष्करासमोर आहे़ या आव्हानालाही तोंड देण्याची तयारी भारतीय लष्कराने चालवली आहे, असे सिंह यावेळी म्हणाले़ जवानांच्या कल्याणकारी योजनांवर सरकार लवकरच सकारात्मक निर्णय घेईल.

Web Title: Keep peace in Jammu and Kashmir