माझा काही संबंध नाही, काँग्रेसने परवानगीशिवाय 'तो' व्हिडिओ वापरला; केके मेननचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 16:18 IST2025-08-12T16:17:41+5:302025-08-12T16:18:48+5:30

Kay Kay Menon On Vote Chori campaign: काँग्रेसने आपल्या सोशल मीडिया हँडलवरुन 'व्होट चोरी' कँपेनचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

Kay Kay Menon On Vote Chori campaign: Video used without my permission | माझा काही संबंध नाही, काँग्रेसने परवानगीशिवाय 'तो' व्हिडिओ वापरला; केके मेननचे स्पष्टीकरण

माझा काही संबंध नाही, काँग्रेसने परवानगीशिवाय 'तो' व्हिडिओ वापरला; केके मेननचे स्पष्टीकरण

Kay Kay Menon On Vote Chori campaign: काँग्रेसने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये 'Special Ops'मधील हिम्मत सिंह, म्हणजेच अभिनेता केके मेनन काँग्रेसच्या 'व्होट चोरी' कँपेनचा प्रचार करताना दिसतोय. मात्र, हा व्हिडिओ एडीट केलाला असल्याचे समोर आले आहे. स्वतः केके मेनन याने या व्हिडिओबाबत स्पष्टीकरण दिले आहे. 


व्हिडिओमध्ये नेमकं काय?
काँग्रेसने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये केके मेनन म्हणतो, थांबा थांबा स्क्रोल करू नका. तुम्ही ही रील पाहत असाल, तर याचा अर्थ काय? यानंतर, व्हिडिओमध्ये दुसरा व्यक्ती दिसतो, जो मत चोरीविरुद्धच्या मोहिमेत सामील होण्याचे आवाहन करतो. दरम्यान, केके मेनन याने स्पष्ट केले आहे की, त्याने अशा कोणत्याही मोहिमेत भाग घेतला नाही.

परवानगीशिवाय व्हिडिओ वापल्याचा आरोप
काँग्रेसच्या या व्हिडिओबाबत स्पष्टीकरण देताना केके मेनन म्हणाला की, "मी या जाहिरातीत काम केलेले नाही. माझी स्पेशल ऑप्स वेब सीरिजची क्लिप परवानगीशिवाय एडीट करुन वापरण्यात आली आहे." आता त्याच्या स्पष्टीकरणावर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रियाही येत आहेत. काही जण म्हणत आहेत की, ही फार मोठी गोष्ट नाही, त्याकडे दुर्लक्ष करा. तर, काही जण म्हणत आहेत, एखाद्या अभिनेत्याच्या परवानगीशिवाय पक्ष त्याचा व्हिडिओ कसा वापरू शकतो.

दरम्यान, केके मेननच्या स्पेशल ऑप्सचा वेब सिरीज सीझन २ काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला आहे. मूळ व्हिडिओमध्ये केके मेनन याने आपल्या वेब सिरीजचे प्रमोशन केले होते. पण, आता काँग्रेसने हा व्हिडिओ आपल्या कँपेनमध्ये वापरल्याने वाद निर्माण झाला आहे.स्पेशल ऑप्स पाहण्याबद्दल बोलताना दिसले. हा व्हिडिओ हॉटस्टारने इंस्टाग्रामवर शेअर केला होता.

Web Title: Kay Kay Menon On Vote Chori campaign: Video used without my permission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.