शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
3
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
4
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
5
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
6
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
7
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
8
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
9
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
10
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
11
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
12
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
13
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
14
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
15
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
16
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
17
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
18
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
19
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
20
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

घुमानच्या रेल्वेतही रंगणार कविसंमेलन अन् परिसंवाद

By admin | Updated: March 14, 2015 23:45 IST

- रेल्वेगाड्यांचे आरक्षण फुल्ल : साहित्यिक-रसिकांचे संमेलन रेल्वे रुळापासूनच

- रेल्वेगाड्यांचे आरक्षण फुल्ल : साहित्यिक-रसिकांचे संमेलन रेल्वे रुळापासूनच
नागपूर : पंजाब येथील घुमान येथे ३ ते ५ एप्रिलदरम्यान ८८ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनासाठी विविध ठिकाणाहून रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत. या रेल्वेने येणाऱ्या साहित्यिक आणि रसिकांमुळे विशेष रेल्वेही फुल्ल झाल्या असून संमेलनापूर्वी रेल्वेच्या डब्यातच साहित्यिक-रसिकांचे छोटेखानी अनौपचारिक संमेलन होण्याची चिन्हे आहेत, असे अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
रेल्वेगाड्याच्या बोग्यांना दिवंगत कवी आणि लेखकांची नावे देण्यात आली असून संबंधित कवी आणि लेखकाचे साहित्य बोगीत ठेवण्यात येईल, असे डॉ. माधवी वैद्य म्हणाल्या. यंदा घुमान येथील साहित्य संमेलनाला रसिकांना जाता यावे म्हणून नाशिक आणि मुंबई येथून विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहे. नाशिक येथून १ एप्रिल रोजी निघणारी रेल्वे अकोला, नागपूर मार्गे भोपाळ, अमृततांडा येथे ३ तारखेला पोहोचेल. तर मुंबईहून निघणारी रेल्वे पुणे, भुसावळ, मनमाडमार्गे बियास येथे पोहोचेल. या दोन दिवसांच्या प्रवासात बोगीत कविसंमेलन आणि परिसंवादही रंगणार आहेत. आता तर रेल्वेगाड्या फुल्ल झाल्या असून विमानांचेही आरक्षण फुल्ल झाले आहे. घुमानच्या साहित्य संमेलनात सहा ते सात हजार साहित्यप्रेमी येण्याची शक्यता असून विदर्भातून १९० लोकांनी नोंदणी केली आहे. यासंदर्भातले रेल्वेचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल. पंजाब शासनानेही हे साहित्य संमेलन पंजाब राज्याचा कार्यक्रम जाहीर केला असून भोजन आणि इतर व्यवस्था पंजाब शासनातर्फे करण्यात येणार आहे. या निमित्ताने घुमानचा विकास करण्याचा संकल्पही पंजाब सरकारने व्यक्त केला आहे. संमेलनासाठी पंजाब सरकारने मोठा निधी खर्च केला आहे. महाराष्ट्र राज्य शासनाचा निधीही संमेलनाला लवकरच मिळेल, अशी अपेक्षाही माधवीताईंनी यावेळी व्यक्त केली.