शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक वाहकाच्या मृत्यूने काश्मीर खोरे तापले

By admin | Updated: October 20, 2015 04:26 IST

उधमपूरमधील पेट्रोल बॉम्बहल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या ट्रक वाहकावर सोमवारी कडेकोट बंदोबस्तात दफनविधी करण्यात आला. गोमांस वाहतुकीच्या संशयावरून झालेल्या या

- अंत्ययात्रेनंतर हिंसाचार

श्रीनगर : उधमपूरमधील पेट्रोल बॉम्बहल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या ट्रक वाहकावर सोमवारी कडेकोट बंदोबस्तात दफनविधी करण्यात आला. गोमांस वाहतुकीच्या संशयावरून झालेल्या या हल्ल्याच्या निषेधार्थ फुटीरवादी व काही संघटनांनी पुकारलेला बंद आणि अनेक ठिकाणी सुरक्षा जवान-निदर्शकांमध्ये उडालेल्या चकमकींमुळे काश्मीर खोरे ढवळून निघाले. बनिहाल येथून रेल्वेसेवा स्थगित करण्यात आली तर जम्मू-श्रीनगर महामार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली होती. जाहीद अहमद या ट्रक वाहकाच्या मृत्यूची वार्ता पसरताच रविवारपासून खोऱ्यात हिंसाचार उफाळून आला होता. त्यानंतर आठ पोलीस ठाण्यांत संचारबंदीसदृश निर्बंध लागू करून फुटीरवादी नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. सोमवारी जाहीदचा मृतदेह शासकीय विमानाने दिल्लीतून आणण्यात आला. अनंतनागच्या बातेनगू या त्याच्या गावी अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी एका तरुणाने पाकिस्तानी झेंडा झेंडाही फडकावला. १७ आॅक्टोबरला काश्मीरकडे जात असलेल्या एका ट्रकवर गोमांस असल्याच्या संशयावरून पेट्रोल बॉम्बहल्ला करण्यात आला होता. ज्यात चालक व वाहक जखमी झाले होते. हल्ला करणाऱ्या सात जणांना अटक करण्यात आली असून, त्यांपैकी पाच आरोपींविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ट्रकचा वाहक जाहीद अहमद याचा रविवारी दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात मृत्यू झाला.