शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

काश्मिरात ३ अतिरेक्यांचा खात्मा,‘लष्कर’च्या एका दहशतवाद्यास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 06:20 IST

मोहिमेदरम्यान अतिरेकी आणि सुरक्षादलादरम्यान चकमक उडाली

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात झालेल्या चकमकीत सुरक्षादलाने स्वयंघोषित कमांडरसह हिज्बुल मुजाहिदीनच्या तीन अतिरेक्यांचा खात्मा केला. या भागात अतिरेकी असल्याची खबर मिळाल्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा सुरक्षादलाने त्राल भागाची नाकेबंदी करून शोधमोहीम सुरू केली होती.

मोहिमेदरम्यान अतिरेकी आणि सुरक्षादलादरम्यान चकमक उडाली. यात जहांगीर अहमद वनी, राजा उमर मकबूल आणि सदात अहमद ठोकर हे तीन अतिरेकी ठार झाले. हमद राजा ठार झाल्यानंतर जहांगीर अहमदने हिज्बुल मुजाहिदीनची सूत्रे हाती घेतली होती. चकमक घडलेल्या ठिकाणांहून दोन एके-रायफली, एक पिस्तूल आणि दोन बॉम्ब, शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला, असे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी सांगितले. मागच्या महिन्यापासून आतापर्यंत विविध ठिकाणच्या चकमकीत २३ दहशतवादांचा खात्मा करण्यात आला. दोन नागरिकांच्या हत्येसह वनी आणि मकबूल अनेक दहशतवादी गुन्ह्यात सामील होते. गोळीबार तसेच दुकाने व ट्रक जाळपोळीच्या घटनेतही ते सामील होते. यावर्षी जानेवारीपासून काश्मीरमध्ये आठ मोहिमांत १९ अतिरेकी ठार झाले आहे. यापैकी चौघे जम्मू भागातील मोहिमेत ठार झाले. २०२० मध्ये काश्मिरात सुरक्षादलाच्या दहा मोहिमा यशस्वी झाल्या.‘लष्कर’च्या एका दहशतवाद्यास अटकपोलिसांनी कुलगाम जिल्ह्यात लष्कर- ए- तैयबा या संघटनेच्या एका सक्रिय दहशतवाद्याला अटक केली. झुबैर अहमद गनै, असे त्याचे नाव आहे. चौकशीनुसार तो रसदपुरवठा, दहशतवाद्यांना आश्रय देणे आणि त्यांना प्रवासासाठी मदत करण्यात सामील होता. त्याच्याकडून आक्षेपार्ह साहित्य, दारूगोळा, मोबाईल फोन, तसेच अतिरेक्यांची ने-आण करण्यासाठी वापरलेले वाहनही जप्त करण्यात आले आहे, असे पोलीस प्रवक्त्याने सांगितले.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी