काश्मिरात संशयित दहशतवाद्यांचा दोन ठिकाणी गोळीबार

By Admin | Updated: December 28, 2016 01:39 IST2016-12-28T01:39:42+5:302016-12-28T01:39:42+5:30

काश्मीरमध्ये संशयित दहशतवाद्यांनी मंगळवारी सायंकाळी पोलीस व नागरिकांवर गोळीबार केला. सुमारे ७.१५ वाजता अज्ञात कारमधून आलेल्या दहशतवाद्यांनी बंदीपोरामधील

In Kashmir, suspected militants fired at two places | काश्मिरात संशयित दहशतवाद्यांचा दोन ठिकाणी गोळीबार

काश्मिरात संशयित दहशतवाद्यांचा दोन ठिकाणी गोळीबार

ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 28 - काश्मीरमध्ये संशयित दहशतवाद्यांनी मंगळवारी सायंकाळी पोलीस व नागरिकांवर गोळीबार केला. सुमारे ७.१५ वाजता अज्ञात कारमधून आलेल्या दहशतवाद्यांनी बंदीपोरामधील आस्तेननगू गावातील बशीर अहमद शेख यांच्यावर गोळीबार केला. त्यांच्या पोटात गोळ्या घुसल्या आहेत.

दुसऱ्या घटनेत श्रीनगरपासून ३० कि.मी. दूरवरील पुलवमा जिल्ह्यात पोलिसांच्या पेट्रोलिंग पार्टीवर गोळीबार झाला. एका वाहनाला लासीपोरा येथे थांबविले असता वाहनातून गोळीबार करण्यात आला. पोलिसांनी प्रत्युत्तरात गोळीबार केला. यात दहशतवादी आलेल्या वाहनाने पळून गेले. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरु करण्यात आली असून या गोळीबारात कोणताही पोलीस जखमी झाला नसल्याचे सांगण्यात आले.

Web Title: In Kashmir, suspected militants fired at two places