शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR vs SRH Final : आंद्रे रसेलने २ विकेट्स घेऊन केला डान्स, Kavya Maran च्या संघाने गमावला जेतेपदाचा चान्स
2
मुंबईत पावसाची शक्यता, मराठवाड्यातही विजांच्या कडकडाटासह बरसणार; २४ तासांसाठी हवामान अंदाज
3
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
4
डबलिनला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
5
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
6
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
7
"बलात्कार, जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत", स्वाती मालीवाल यांचा AAP वर गंभीर आरोप
8
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीची घरात घुसून हत्या; चोरांकडून कृत्य की ओळखीच्या व्यक्तीकडूनच घात?
9
मोठी बातमी : यजमान वेस्ट इंडिजने अखेरच्या क्षणाला संघ बदलला, अनुभवी खेळाडूची स्पर्धेतून माघार   
10
ENG vs PAK : ...म्हणूनच पाकिस्तानचा पराभव होतोय; माजी खेळाडूनं सांगितली मैदानाबाहेरील गोष्ट
11
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
12
कल्याणमधील 'तो' अ‍ॅसिड हल्ला बनावट; UPSC करणाऱ्या तरुणीचे बिंग पोलिसांनी 'असं' फोडलं
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

Karnataka Politics : कर्नाटकात राजकीय खळबळ, सरकारमधील मंत्र्यानेच मुख्यमंत्र्यांविरोधात पुकारले बंड!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 10:37 PM

Karnataka Politics : मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्यावर कामात हस्तक्षेप केल्याचा आरोप के. एस. ईश्वरप्पा यांनी केला आहे.

ठळक मुद्देकर्नाटकातील बहुचर्चित ऑपरेशन लोटसप्रकरणी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना बंगळुरू हायकोर्टाने मोठा झटका दिला आहे.

बंगळुरू : कर्नाटकातील बहुचर्चित ऑपरेशन लोटसप्रकरणी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा (CM BS Yediyurappa) यांना बंगळुरू हायकोर्टाने मोठा झटका दिला आहे. याप्रकरणाची चौकशी करण्यास हायकोर्टाने परवानगी दिली आहे. त्यामुळे बीएस येडियुरप्पा यांच्यासमोर अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याताच आता त्यांच्याच सरकारमधील मंत्री के. एस. ईश्वरप्पा (KS Eshwarappa) यांनी बीएस येडियुरप्पा यांच्याविरुद्ध बंड पुकारले आहे. (karnataka minister ks eshwarappa writes to governor vajubhai vala alleging interference by cm bs yediyurappa)

मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्यावर कामात हस्तक्षेप केल्याचा आरोप के. एस. ईश्वरप्पा यांनी केला आहे. त्यांनी राज्यपाल वजुभाई वाला यांना पत्र लिहून बीएस येडियुरप्पा यांची तक्रार केली आहे. याचबरोबर, राज्य सरकारमध्ये ग्रामविकास मंत्री असलेल्या के. एस. ईश्वरप्पा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांनाही त्यांच्या पत्राची प्रत पाठविली आहे. मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी आपल्या विभागाची परवानगी न घेता 774 कोटी रुपये वाटप केल्याचा आरोप के. एस. ईश्वरप्पा यांनी केला आहे. तसेच, या वाटपामध्ये पक्षपात केल्याचा आरोपही के. एस. ईश्वरप्पा यांच्याकडून करण्यात आला आहे.

कर्नाटकातील 'ऑपरेशन लोटस'ची चौकशी होणारदरम्यान, कर्नाटकातील बहुचर्चित ऑपरेशन लोटसप्रकरणी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना बंगळुरू हायकोर्टाने मोठा झटका दिला आहे. याप्रकरणाची चौकशी करण्यास हायकोर्टाने परवानगी दिली आहे. जनता दल सेक्युलरचे नेते नगन गौडा यांचे चिरंजीव शरण गौडा यांनी याप्रकरणी एफआयआर दाखल केला होता. हा एफआयआर रद्द करण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. कोर्टाने हा एफआयआर रद्द करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली आहे.

ऑडिओ क्लिपने खळबळकर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार पाडण्यासाठी 2019मध्ये भाजपा नेते येडियुरप्पा यांनी ऑपरेशन लोटसच्या माध्यमातून षडयंत्र रचल्याचा आरोप आहे. त्याबाबतचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. वडिलांना राजीनामा द्यायला सांग किंवा पक्ष सोडायला सांग असे येडियुरप्पा एका आमदाराच्या मुलाला सांगत असल्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. ही ऑडिओ क्लिप आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.

टॅग्स :B. S. Yeddyurappaबी. एस. येडियुरप्पाKarnatak Politicsकर्नाटक राजकारणBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाJ P Naddaजगत प्रकाश नड्डा