Join us  

KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 

सनरायर्झस हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून घेतलेला प्रथम फलंदाजीचा निर्णय कोलकाता नाईट रायडर्सच्या पथ्यावर पडला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 8:03 PM

Open in App

IPL 2024, KKR vs SRH Final Marathi Live : सनरायर्झस हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून घेतलेला प्रथम फलंदाजीचा निर्णय कोलकाता नाईट रायडर्सच्या पथ्यावर पडला. Mitchell Starc ने पहिल्याच षटकात SRH चा सलामीवीर अभिषेक शर्माचा भन्नाट चेंडूवर त्रिफळा उडवला. स्टार्कने हा चेंडू खरं तर ट्रॅव्हिस हेडसाठी राखून ठेवला होता, परंतु या पर्वातील सर्वोत्तम चेंडूवर अभिषेकची विकेट पडली. 

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ चा फायनल सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर सुरू आहे.  पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि प्लेइंग इलेव्हनमध्ये अब्दुल समदच्या जागी शाहबाज अहमद याला संधी दिली आहे. KKR चा कर्णधार श्रेयस अय्यर याने आम्हाला प्रथम गोलंदाजीच करायची होती असे म्हटले. श्रेयस अय्यर हा आयपीएल एतिहासातील एकमेव कर्णधार आहे की, वेगवेगळ्या संघाचे फायनलमध्ये (Delhi Capitals in 2020 and Kolkata Knight Riders in 2024) नेतृत्व करणार आहे. KKR ने २०१२ व २०१४ मध्ये लक्ष्याचा पाठलाग करून फायनल जिंकली होती, तर SRH ने २०१६ मध्ये लक्ष्याचा यशस्वी बचाव करून बाजी मारलेली. कोलकाता नाईट रायडर्सने टॉस गमावल्यानंतर एक मजेशीर ट्विट केलं. त्यात त्यांनी टॉस हरलेली मॅच जिंकल्याचे म्हटले.  अभिषेक शर्मा २ धावांवर स्टार्कच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. या पर्वात अभिषेकने ४८४ धावा केल्या आणि अनकॅप्ड खेळाडूची एकाच पर्वातील ही सहावी सर्वोत्तम कामगिरी आहे. अभिषेकने आज सूर्यकुमार यादवचा २०२० सालचा ४८० धावांचा विक्रम मोडला. ट्रॅव्हिस हेड सलग तिसऱ्या सामन्यात अपयशी ठरला आणि वैभव अरोराने त्याला गोल्डन डकवर माघारी पाठवले. राहुल त्रिपाठी KKR ची डोकेदुखी वाढवेल असे वाटले होते, परंतु स्टार्कने त्याला ( ९) बाद करून हैदराबादला २१ धावांवर तिसरा धक्का दिला.  

टॅग्स :आयपीएल २०२४सनरायझर्स हैदराबादकोलकाता नाईट रायडर्स