Join us  

रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ २ जूनपासून सुरू होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 5:34 PM

Open in App

T20 World Cup 2024, Team India : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ २ जूनपासून सुरू होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणार आहे. अमेरिका व वेस्ट इंडिज येथे होणाऱ्या या स्पर्धेसाठी भारतीय संघाची पहिली तुकडी न्यू यॉर्कसाठी काल रवाना झाली. भारताच्या पहिल्या तुकडीत विराट कोहली, हार्दिक पांड्या व संजू सॅमसन दिसले नाही. या तिघांनी BCCI कडे काही काळासाठी विश्रांती मागितल्याचे वृत्त आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली पहिल्या तुकडीने मुंबई विमानतळावर छोटेखानी सेलिब्रेशन केलं. यामध्ये यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत कर्णधार रोहितला केक भरवण्याचा प्रयत्न करताना दिसतोय, परंतु रोहितने त्यास स्पष्ट नकार दिला. 

विराट कोहली RCB च्या पराभवामुळे स्ट्रेसमध्ये? BCCI ला केली खास विनंती अन् म्हणूनच तो...  

रोहित शर्मासह पहिलय्ता तुकडीत जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह, ट्वेंटी-२० क्रमवारीतील अव्वल फलंदाज सूर्यकुमार यादव, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, खलील अहमद, कुलदीप यादव व अक्षर पटेल हेही दिसले. या सर्वांनी मुंबई विमानतळावर छोटसं सेलिब्रेशन केलं आणि रिषभने रोहितला केक देऊ केला. त्याला नकार देत त्यावर रोहित म्हणाला, आपण वर्ल्ड कप विजयाचा केक खाऊ...  विराट कोहली ३० मे रोजी न्यू यॉर्कसाठी रवाना होईल. राजस्थान रॉयल्सचे आयपीएल २०२४ मधील आव्हान क्वालिफायर २ मध्ये संपुष्टात आले, परंतु यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन व युझवेंद्र चहल हे टीम इंडियाच्या पहिल्या तुकडित नव्हते. २ ते २९ जून या कालावधीत अमेरिका व कॅरेबियन बेटांवर वर्ल्ड कप स्पर्धेचे सामने खेळवले जाणार आहेत. 

 न्यू यॉर्कमध्ये भारताचे लीग सामने ५ जून (वि. आयर्लंड), ९ जून ( वि. पाकिस्तान ) आणि १२ जून ( वि. अमेरिका ) रोजी होणार आहेत. कॅनडाविरुद्धचा अंतिम लीग सामना १५ जून रोजी फ्लोरिडामध्ये होणार आहे. 

भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह; राखीव खेळाडू - शुबमन  गिल, रिंकू सिंग, आवेश खान, खलिल अहमद 

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024रोहित शर्मारिषभ पंतभारतीय क्रिकेट संघ