Join us  

हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 

सनरायर्झस हैदराबादची आयपीएल २०२४ च्या फायनलमध्ये सुरुवात निराशाजनक झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 8:18 PM

Open in App

IPL 2024, KKR vs SRH Final Marathi Live : सनरायर्झस हैदराबादची आयपीएल २०२४ च्या फायनलमध्ये सुरुवात निराशाजनक झाली. कोलकाता नाईट रायडर्सचे ३ फलंदाज २१ धावांत तंबूत परतले. अभिषेक शर्मा ( २), ट्रॅव्हिस हेड ( ०) व राहुल त्रिपाठी ( ९) यांना मिचेल स्टार्क व वैभव अरोरा यांनी माघारी पाठवले. हर्षित राणाने SRH ला चौथा धक्का देताना  नितीश कुरमा रेड्डीला १३ धावांवर माघारी पाठवले. 

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ चा फायनल सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर सुरू आहे.  पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि प्लेइंग इलेव्हनमध्ये अब्दुल समदच्या जागी शाहबाज अहमद याला संधी दिली आहे. KKR चा कर्णधार श्रेयस अय्यर याने आम्हाला प्रथम गोलंदाजीच करायची होती असे म्हटले. श्रेयस अय्यर हा आयपीएल एतिहासातील एकमेव कर्णधार आहे . KKR ने २०१२ व २०१४ मध्ये लक्ष्याचा पाठलाग करून फायनल जिंकली होती, तर SRH ने २०१६ मध्ये लक्ष्याचा यशस्वी बचाव करून बाजी मारलेली. 

 अभिषेक शर्मा २ धावांवर स्टार्कच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. या पर्वात अभिषेकने ४८४ धावा केल्या आणि अनकॅप्ड खेळाडूची एकाच पर्वातील ही सहावी सर्वोत्तम कामगिरी आहे. अभिषेकने आज सूर्यकुमार यादवचा २०२० सालचा ४८० धावांचा विक्रम मोडला. ट्रॅव्हिस हेड सलग तिसऱ्या सामन्यात अपयशी ठरला आणि वैभव अरोराने त्याला गोल्डन डकवर माघारी पाठवले. राहुल त्रिपाठी KKR ची डोकेदुखी वाढवेल असे वाटले होते, परंतु स्टार्कने त्याला ( ९) बाद करून हैदराबादला २१ धावांवर तिसरा धक्का दिला. 

विराट कोहलीचा फायदा...ट्रॅव्हिस हेड व अभिषेक शर्मा आज स्वस्तात बाद झाल्याने त्यांना आयपीएल २०२४ मध्ये अनुक्रमे ५६७ व ४८२ धावांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे विराट कोहलीची ऑरेंज कॅप निश्चित झाली. विराटने १५ सामन्यांत १ शतक व ५ अर्धशतकासह ७४१ धावा केल्या आहेत. आयपीएल २०२४ ची ऑरेंज कॅप त्याने पटकावली. २०१६ मध्ये विराटने सर्वाधिक ९७३ धावा करून ऑरेंज कॅप जिंकलेली आणि आयपीएलमध्ये दोन ऑरेंज कॅप जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला.  

टॅग्स :आयपीएल २०२४विराट कोहलीसनरायझर्स हैदराबादरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकोलकाता नाईट रायडर्स