"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 17:54 IST2025-08-29T17:52:43+5:302025-08-29T17:54:16+5:30

मालवीय म्हणाले, काँग्रेस पक्ष कशा पद्धतीने 'मतचोरी' करत आला आहे, हा व्हिडिओ त्याचा पुरावा आहे. हेच लोक आज मताधिकार रॅली काढत आहेत. हे केवढे विडंबन आहे. एवढेच नाही तर, सिद्धरामय्या त्यावेळी मतपत्रिकेद्वारे (बॅलेट पेपर) झालेल्या मतचोरीमुळे हरले होते. राहुल गांधी हीच मतपत्रिकेची व्यवस्था पुन्हा आणण्यासंदर्भात बोलत आहेत, असेही त्यांनी लिहिले.

Karnataka cm Siddaramaiah's statement I lost due to vote fraud exposed the Congress vote rigging issue BJP got a square issue | "१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!

"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!

एकीकडे, भाजप आणि निवडणूक आयोगावर 'मतचोरी'चा आरोप करत, काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे. तर दुसरीकडे, कर्नाटकचेमुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या एका विधानाने काँग्रेसवरच प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. सिद्धरामय्या शुक्रवारी म्हणाले, '१९९१ च्या लोकसभा निवडणुकीत फसवणुकीमुळेच पराभवाचा सामना करावा लागला होता.' आता त्यांच्या या विधानावरू वाद निर्माण झाला आहे. कारण त्यावेळी काँग्रेसचे सरकार होते आणि सिद्धरामय्या जनता दल सेक्युलरचे उमेदवार होते. त्यांनी कोप्पल मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना काँग्रेसचे उमेदवार बसवराज पाटील यांच्याविरुद्ध ११,२०० मतांनी पराभव पत्करावा लागला होता.

तेव्हा बसवराज पाटील यांना एकूण २.४१ लाख मते मिळाली होती, तर सिद्धरामय्या यांना २ लाख ३० हजार मते मिळाली होती. त्या निवडणुकीच्या निकालानंतर सिद्धरामय्या यांनी उच्च न्यायालयातही खटला दाखल केला होता आणि निवडणूक आयोगाने २२,२४३ मते नाकारल्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. 

ते म्हणाले होते, जर ही मते बेकायदेशीर घोषित केली नसती तर आपण स्वतः मोठ्या फरकाने विजयी झालो असतो. त्यांचे म्हणणे होते की, बसवराज पाटील यांची उमेदवारीच अवैध होती, कारण त्यांना लोकसभा अध्यक्षांनी पक्षांतर केल्याबद्दल अपात्र घोषित केले होते. बसवराज पाटील यांना कायमचे अपात्र घोषित करण्यात आले होते, अशा परिस्थितीत ते पुन्हा निवडणूक कशी लढवू शकतात?

कर्नाटकचे माजी महाधिवक्ता रवी वर्मा कुमार यांच्या सत्कार समारंभात बोलताना सिद्धरामय्या म्हणाले, 'मला कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागले, तेव्हा मी रवी वर्मा यांचा कायदेशीर सल्ला घेतला होता. मी १९९१ ची निवडणूक लढवली आणि फसवणूक करून मला हरवण्यात आले. त्यावेळी रवी वर्मा कुमार यांनी मला मदत केली होती.' 

आता भारतीय जनता पक्षाने अर्थात भाजपने त्यांच्या या विधानाचा धागा पकडत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. यासंदर्भात बोलताना भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय म्हणाले, काँग्रेस पक्ष कशा पद्धतीने 'मतचोरी' करत आला आहे, हा व्हिडिओ त्याचा पुरावा आहे. हेच लोक आज मताधिकार रॅली काढत आहेत. हे केवढे विडंबन आहे. एवढेच नाही तर, सिद्धरामय्या त्यावेळी मतपत्रिकेद्वारे (बॅलेट पेपर) झालेल्या मतचोरीमुळे हरले होते. राहुल गांधी हीच मतपत्रिकेची व्यवस्था पुन्हा आणण्यासंदर्भात बोलत आहेत, असेही त्यांनी लिहिले.

Web Title: Karnataka cm Siddaramaiah's statement I lost due to vote fraud exposed the Congress vote rigging issue BJP got a square issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.