शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

Karnataka: कर्नाटक बस कर्मचाऱ्यांच्या संपाने १५२ कोटींचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2021 06:49 IST

Karnataka: Bus strike to enter 9th day, losses cross Rs 152 crore : संपकरी कर्मचारी कामावर परतले नाहीत तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्य सरकारने दिला आहे.

बंगळुरू : वेतनाच्या मुद्द्यावरून कर्नाटकच्या राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या संपामुळे मागील आठ दिवसांत १५२ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. महामंडळाने एका निवेदनात म्हटले आहे की, कर्नाटक राज्य रस्ते परिवहन महामंडळाचे ७० कोटी रुपयांचे, बंगळुरू महानगर परिवहन महामंडळाचे २० कोटी रुपयांचे, वायव्य कर्नाटक रस्ते परिवहन महामंडळाचे ३०.५ कोटी रुपयांचे, तर ईशान्य कर्नाटक रस्ते परिवहन महामंडळाचे ३१.५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.संपकरी कर्मचारी कामावर परतले नाहीत तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्य सरकारने दिला आहे. संपात सामील झाल्याबद्दल प्रशिक्षणार्थी व परिवीक्षा कर्मचाऱ्यांना सेवेतून बरखास्त करण्यात आले आहे. मुख्यमंत्री बी.एस. येदियुरप्पा यांनी एका संदेशात म्हटले आहे की, सरकारने संपकरी कर्मचाऱ्यांच्या नऊ पैकी आठ मागण्या मान्य केलेल्या आहेत. पुढील वेतन आयोग लागू करण्याची मागणी मान्य करण्यात येणार नाही.  राज्याची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसल्यामुळे ही मागणी कोणत्याही परिस्थितीत मान्य करता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 

१७,००० बसेसपैकी ३,०२४ बसेसच सुरू- परिवहन विभागाच्या चारही महामंडळांपैकी एकूण १७,००० बसेसपैकी ३.०२४ बसेसच सुरू आहेत. यापैकी १,५७२ बसेस केएसआरटीसीची तर ३९४ बसेस बीएमटीसीच्या आहेत.- बस कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. बस वाहतूक सुरळीत करण्यासाठी राज्य सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत.- सेवानिवृत्त झालेल्या व वैद्यकीयदृष्ट्या सक्षम असलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर येण्याची विनंती केली आहे.nतसेच काही खासगी कर्मचाऱ्यांचीही या कामी मदत घेण्यात येत आहे.

टॅग्स :Karnatakकर्नाटक