शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटक विधानसभा पोटनिवडणूक, काँग्रेसने मान्य केला पराभव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 12:32 IST

राज्यात सत्तेवर असलेल्या येडियुरप्पा सरकारच्या दृष्टीने आजचा पोटनिवडणुकीचा निकाल महत्त्वपूर्ण आहे.

बंगळुरू - संपूर्ण देशातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या कर्नाटक विधानसभेच्या  पोटनिवडणुकीत भाजपाने मोठ्या विजयाच्या दिशेने आगेकूच केली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार भाजपाने 4 जागांवर विजय मिळवला आहे, तर 8 जागांवर भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहेत. दरम्यान, पोटनिवडणुकीच्या निकालांचे कल हाती येऊ लागल्यानंतर काँग्रेसने आपला पराभव मान्य केला आहे. आम्ही आमचा पराभव मान्य करतो, मतदारांनी बंडखोरांना स्वीकारल्याचे या निकालांमधून दिसत आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डी. के. शिवकुमार यांनी दिली आहे. राज्यात सत्तेवर असलेल्या येडियुरप्पा सरकारच्या दृष्टीने आजचा पोटनिवडणुकीचा निकाल महत्त्वपूर्ण आहे. त्यात पक्षाने आघाडी घेतल्याने येडियुरप्पा आणि भाजपाला दिलासा मिळाला आहे. दरम्यान, काँग्रेसने कल हाती आल्यानंतर आपली हार मान्य केली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डी. के. शिवकुमार निकालांवर प्रतिक्रिया देताना म्हणाले की,  ''15 विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत मतदारांनी दिलेल्या जनादेशाशी आपल्याला सहमत व्हावे लागेल. मतदारांनी पक्षांतर करणाऱ्या उमेदवारांना स्वीकारले आहे. मात्र या निकालांमुळे निराश होण्याची गरज नाही,''  2018 मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा त्रिशंकू निकाल लागल्यापासून राज्यात सत्तासंघर्ष सुरू आहे. त्यावेळी सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा दिला होता. मात्र काँग्रेस आणि जेडीएस सरकारमधील 17 आमदारांनी बंडखोरी केल्याने जुलै महिन्यात एच .डी . कुमारस्वामी यांचे सरकार कोसळले होते. त्यानंतर राज्यात येडियुरप्पा यांच्या नेतृत्वात भाजपाने पुन्हा एकदा सत्ता मिळवली. मात्र, ज्या आमदारांनी राजीनामे देत एच .डी . कुमारस्वामी सरकारचा पाठिंबा काढून घेतला. या आमदारांना तत्कालीन विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरविले होते. आमदार अपात्र ठरल्याने रिक्त झालेल्या 15 मतदारसंघांमध्ये 5 डिसेंबर रोजी पोटनिवडणूक घेण्यात आली होती. 

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण