शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
2
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
3
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
4
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
5
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
6
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
7
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
8
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
9
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
10
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
11
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
12
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
13
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
14
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
15
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
16
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
17
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
18
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
19
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
20
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

Kapil Mishra : "अरविंद केजरीवाल ओव्हरअ‍ॅक्टिंग करतात, जनतेची दिशाभूल..."; कपिल मिश्रांचं 'आप'वर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 10:28 IST

Kapil Mishra And Arvind Kejriwal : दिल्ली सरकारमधील कॅबिनेट मंत्री कपिल मिश्रा यांनी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

दिल्ली सरकारमधील कॅबिनेट मंत्री कपिल मिश्रा यांनी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. मद्य घोटाळा प्रकरणी अद्याप उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून हे प्रकरण पूर्णपणे संपलेलं नाही असं त्यांनी म्हटलं आहे. अरविंद केजरीवाल फक्त 'ओव्हरअ‍ॅक्टिंग' करत असल्याचा आरोप मिश्रा यांनी केला. तसेच केजरीवाल जेव्हा सरकारमध्ये होते तेव्हाही जनतेची दिशाभूल करत होते आणि आजही तेच करत आहेत. दिल्लीची जनता ११ वर्षे त्रस्त असून आता सत्य सर्वांसमोर आलं आहे असंही ते म्हणाले.

"मद्य घोटाळा प्रकरणात सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय या दोघांनीही महत्त्वाची माहिती दिली आहे. असं असूनही केजरीवाल स्वतःला निर्दोष सांगत आहेत. जर मद्य धोरण योग्य होतं, तर तक्रार होताच ते मागे का घेण्यात आलं?" चौकशी सुरू होताच अनेक मोबाईल तोडण्यात आले, असा गंभीर आरोपही मिश्रा यांनी केला.

कपिल मिश्रा पुढे म्हणाले की, "घाऊक व्यापाऱ्यांचं कमिशन ५ टक्क्यांवरून वाढवून १२ टक्के करण्यात आलं होतं." त्यांनी सीएजी रिपोर्टचा हवाला देत महसूल नुकसानीचा मुद्दाही उपस्थित केला. मात्र आम आदमी पक्षाने हे सर्व आरोप फेटाळून लावत कोणताही भ्रष्टाचार झाला नसल्याचा दावा आधीच केला आहे.

जनतेचं न्यायालय सर्वात मोठं - कपिल मिश्रा

पत्रकार परिषदेत मिश्रा यांनी दिल्लीतील रस्ते, पाणी, सांडपाणी, शाळा, रुग्णालय आणि यमुना नदीच्या स्वच्छतेचा मुद्दा उपस्थित केला. ११ वर्षांत परिस्थिती सुधारण्याऐवजी अधिक बिघडली आहे. जनतेचं न्यायालय हे सर्वात मोठं असतं आणि दिल्लीच्या जनतेने निवडणुकीत त्याचं उत्तर दिलं आहे असंही त्यांनी नमूद केलं.

मागील विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला होता, ज्यामध्ये अनेक मोठ्या नेत्यांचा पराभव झाला. आता हे प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयात पोहोचलं असून न्यायालयाचा निकाल अत्यंत महत्त्वाचा ठरेल. जाणकारांच्या मते, हा मुद्दा आगामी निवडणुकांमध्ये, विशेषतः दिल्ली, गुजरात आणि पंजाबच्या राजकारणात मोठ्या प्रमाणावर गाजण्याची शक्यता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kapil Mishra slams Kejriwal, accuses him of misleading the public.

Web Summary : Kapil Mishra accuses Arvind Kejriwal of 'overacting' and misleading the public regarding the liquor scam case. He alleges corruption in the policy, questioning its withdrawal and destruction of evidence. Mishra highlights failures in Delhi's infrastructure and blames Kejriwal for the city's deteriorated state over the past 11 years.
टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपBJPभाजपाdelhiदिल्लीPoliticsराजकारण