शहरं
Join us  
Trending Stories
1
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
2
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
3
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
4
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
5
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
6
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
7
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
8
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
9
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
10
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
11
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
12
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
13
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
14
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
15
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
16
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
17
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
18
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
19
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...

CoronaVirus: व्वा...! भाजप आमदाराची धाव; 3 मजली घराला कोवीड रुग्णालय बनविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलं पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2021 8:54 PM

त्यांच्या या 34 रूम आणि 5 हॉल असलेल्या तीन मजली घरात 113 बेड बसू शकतात...

कानपूर - संपूर्ण देशातच कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. उत्तर प्रदेशातील कानपूरमध्येही कोरोना संक्रमण वाढताना दिसत आहे. येथे लोकांना रुग्णालयांत बेड मिळणेही कठीण होत आहे. अशा भयावह स्थितीत भाजप आमदार सुरेंद्र मैथानी यांनी आपले घर कोरोना संक्रमितांसाठी निःशुल्क देण्याचा निर्णय घेतला आहे. (kanpur BJP MLA Surendra Maithani writes letter to DM for his house to convert temporary corona hospital)

यासंदर्भात मैथानी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून आपल्या घराचे कोरोना संक्रिमितांसाठी क्वारंटाइन सेंटर अथवा अस्थाई स्वरुपाच्या रुग्णालय रुपांतर करण्यात यावे, असे म्हटले आहे. याच बरोबर, त्यांच्या या तीन मजली घरात 113 बेड बसू शकतात, असेही त्यांनी म्हटले आहे.

मैथानीही झाले होते कोरोना संक्रमित -यापूर्वी भाजप आमदार सुरेंद्र मैथानी यांनी शहरातील भाजपच्या सर्व 9 आमदारांनी एक-एक कोटी रुपयांचा निधी शहरात कोरोना रुग्णालयाला द्यावा, यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. सुरेंद्र मैथानी यांनी म्हटले आहे, की त्यांनाही गत वेळी कोरोना संक्रमण झाले होते. साडे तीन महिन्यांच्या उपचारानंतर ते बरे झाले होते. ते म्हणाले, शहरात असे अनेक कुटुंब आहेत, जे एकाच खोलीत राहतात. अशा स्थितीत कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली, तर सर्वांनाच संक्रमण होणे निश्चित आहे.

Covid-19 second wave: हार्ट अ‍ॅटॅकमुळे का होतोय कोरोना बाधितांचा मृत्यू? जाणून घ्या, लक्षणं आणि उपचार

प्रशासनाच्या चमूने सर्व्हेही केला - सुरेंद्र मैथानी यांनी म्हटले आहे, की ''अशा स्थितीमुळेच मी माझे घर कोरोना संक्रमितांना राहण्यासाठी दिले आहे. जिल्हाधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर, पत्र लिहून आपले 34 रूम आणि 5 हॉल असलेले घर जिल्हा प्रशासनाला देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाच्या चमूने त्यांच्या घराचा सर्व्हेही केला आहे. याच बरोबर, या आणीबाणीच्या स्थितीत सर्व राजकीय पक्षाच्या लोकांनी राजकारण बाजूला सारून लोकांच्या मदतीसाठी समोर यायला हवे,'' असेही मैथानी यांनी म्हटले आहे.

गेल्या 24 तासांत देशात 3,780 जणांचा कोरोनाने मृत्यू -गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 3,82,315 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 3,780 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 2,06,65,148 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 2,26,188 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. बुधवारी (5 मे) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3 लाख 82 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तब्बल दोन कोटींवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा दोन लाखांवर पोहोचला आहे. 

CoronaVirus: चिंताजनक! भारतात मे नंतर आणखी हाहाकार माजवणार कोरोना, वैज्ञानिकांचा दावा!

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBJPभाजपाMLAआमदारUttar Pradeshउत्तर प्रदेश