CoronaVirus: चिंताजनक! भारतात मे नंतर आणखी हाहाकार माजवणार कोरोना, वैज्ञानिकांचा दावा!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 02:04 PM2021-05-04T14:04:37+5:302021-05-04T14:15:16+5:30

या अभ्यासानुसार, भारतात कोरोनाची दुसरी लाट जून महिन्यात पीकवर असेल. हा अनुमान अमेरिका, ब्राझील आणि UK सह 12 देशांच्या विश्लेषणावर आधारित आहे.

भारतात एप्रिल महिन्यात कोरोनामुळे झालेल्या विक्रमी मृत्यूंमुळे सर्वांनाच हादरा बसला आहे. विविध अभ्यास आणि संशोधकांचे म्हणणे आहे, की 15 मेच्या जवळपास कोरोनाचा पीक येऊ शकतो आणि यानंतर याचा वेग कमी होईल. मात्र, भारतासाठी हा कठीण काळ आणखी वाढण्याची शक्यता असल्याचा दावा एका नव्या अभ्यासात करण्यात आला आहे. (Corona virus india second wave might not peak before june says study)

एका नव्या अभ्यासानुसार, कोरोनाच्या पीकचा कालावधी जूनपर्यंत जाऊ शकतो. हा अभ्यास हाँगकाँगची एका ब्रोकरेज कंपनी CLSA ने केला आहे.

या अभ्यासानुसार, भारतात कोरोनाची दुसरी लाट जून महिन्यात पीकवर असेल. हा अनुमान अमेरिका, ब्राझील आणि UK सह 12 देशांच्या विश्लेषणावर आधारित आहे.

संबंधित 12 देशांनाही कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा सामना करावा लागला आहे. अभ्यासानुसार, या 12 देशांत, एकूण लोकसंख्येच्या 2 टक्के लोक जेव्हा कोरोनाच्या विळख्यात आले, तेव्हा तेथे कोरोनाचा पीक आला.

अभ्यासात म्हणण्या आले आहे, की 'सध्या भारतातील दुसऱ्या लाटेत देशातील एकूण लोकसंख्येच्या 0.5 टक्के लोकच संक्रमित झाले आहेत आणि 2 कट्के लोक संक्रिमित होण्यासाठी जवळपास दोन महिन्यांचा कालावधी लागू शकतो.

सध्या महाराष्ट्र 1.8 टक्क्यांवर आहे. तसेच एका आठवड्यापेक्षाही कमी वेळात तो या पातळीवर पोहोचू शकतो.'

अभ्यासात वर्तवण्यात आलेला हा अंदाज निश्चितपणे चिंता वाढवणार आहे. कोरोना रुग्ण संख्या आणि यामुळे होत असलेले मृत्यू जूनपर्यंत असेच सुरू राहिले, तर परिस्थिती आणखी भयावह होऊ शकते.

यापूर्वी, अमेरिकेतील मिशिगन युनिव्हर्सिटीमध्ये महामारी तज्ज्ञ असलेल्या भ्रामर मुखर्जी यांनीही भारतातील कोरोना रुग्ण संख्येसंदर्भात ट्विट केले होते. त्यांनी देशातील कोरोना स्थितीवर सावध करताना म्हटले होते, की मे महिन्याच्या मध्यावधीपर्यंत रोजच्या रोज 8-10 लाख नवे रुग्ण समोर येऊ शकतात आणि 23 मेच्या जवळपास रोजच्या रोज 4,500 लोकांना आपला जीव गमवावा लागू शकतो.

याशिवाय, आयआयटीतील वैज्ञानिकांच्या एका चमूनेही जारी केलेल्या अभ्यासात, येणाऱ्या काळातील कोरोना संक्रमितांसंदर्भात भाष्य केले आहे. या वैज्ञानिकांनी शंका व्यक्त केली आहे, की मे महिन्याच्या मध्यापर्यंत नव्या कोरोना रुग्णांची संख्या 10 लाखच्याही वर जाऊ शकते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता देशातील 18 वर्षांवरील लोकांनाही लस देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. लवकरात लवकर अधिकाधिक लोकांना लस देऊन कोरोना महामारी नियंत्रण मिळविले जाऊ शकेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.