कन्हैय्या कुमार ३९ व्या स्थानी, निवडणुकांसाठी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 08:17 PM2023-01-28T20:17:35+5:302023-01-28T20:19:52+5:30

या निवडणुकांसाठी स्टार प्रचारकांचीही यादी जाहीर केली आहे. 

Kanhaiya Kumar ranks 39th, list of Congress star campaigners for elections released of tripura vidhansabha | कन्हैय्या कुमार ३९ व्या स्थानी, निवडणुकांसाठी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर

कन्हैय्या कुमार ३९ व्या स्थानी, निवडणुकांसाठी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर

googlenewsNext

देशातील तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर झाली असून आता उमेदवारांचाही घोषणा होत आहे. त्यापैकी, त्रिपुरा विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसच्या १७ उमेदवारांची घोषणा झाली असून सुदीप रॉय बर्मन हे आगरतला येथून निवडणूक लढवणार आहेत. त्रिपुरा येथील ६० विधानसभा जागांच्या निवडणुकांसाठी १६ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. त्यासाठी, २ मार्च रोजी निकाल हाती येणार आहे. काँग्रेसने आज १७ उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली असून या निवडणुकांसाठी स्टार प्रचारकांचीही यादी जाहीर केली आहे. 

काँग्रेसकडून १७ उमेदवारांसह त्रिपुरा विधानसभा निवडणुकांसाठी स्टार प्रचारकांची यादीही जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये, एकूण ४० काँग्रेस नेत्यांची नावे असून कन्हैय्या कुमारचे नाव ३९ व्या स्थानी आहे. त्यांच्यानंतर बंधु तिरके हे ४० वे स्टार प्रचारक आहेत. काँग्रेसकडून पहिल्या क्रमांकाचे स्टार प्रचारक म्हणून विद्यमान अध्यक्ष मल्लीकार्जुन खर्गे आहेत. तर, दुसऱ्या क्रमांकावर राहुल गांधी, तिसऱ्या क्रमांकावर प्रियंका गांधी यांची नावे आहेत. 

Web Title: Kanhaiya Kumar ranks 39th, list of Congress star campaigners for elections released of tripura vidhansabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.