शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसकडून टॅलेंट हंट सुरू! दोन तरुण नेते पक्षात प्रवेश करणार?; राहुल गांधींसोबत बैठकांचं सत्र सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2021 16:25 IST

दोन तरुण नेते लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता; बैठकांचं सत्र सुरू

नवी दिल्ली: ज्योतिरादित्य सिंधिया, जितिन प्रसाद, सुष्मिता देव यासारख्या तरुण नेत्यांनी काँग्रेसला रामराम केला. त्यानंतर आता काँग्रेसनं तरुण नेत्यांची फळी उभारण्यासाठी कंबर कसली आहे. जवाहरलाल नेहरु विद्यापीठातल्या (जेएनयू) आंदोलनामुळे प्रसिद्धिच्या झोतात आलेले कन्हैया कुमार काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात. 

कम्युनिस्ट पक्षाचे नेते कन्हैया कुमार यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती. गुजरातमध्येही काँग्रेसला एका नवा चेहरा मिळू शकतो. जिग्नेश मेवाणीदेखील काँग्रेसच्या संपर्कात असून त्यांनीही गांधींची भेट घेतली आहे. त्यामुळे बिहारपासूनगुजरातपर्यंत काँग्रेसनं नव्या चेहऱ्यांचा शोध सुरू केल्याचं दिसत आहे. यासाठी पक्षात बैठकांचं सत्र सुरू आहे. कन्हैया कुमार आणि राहुल गांधींची भेट गुप्त ठेवण्याचा शक्य तितका प्रयत्न करण्यात आला. बिहार काँग्रेसचे प्रभारी भक्त चरण दास यांनादेखील कुमार-गांधींच्या भेटीची माहिती नव्हती. 'चित्राताई व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीच्या टॉपर, आता बदामाचा खुराक सुरू करा'

कन्हैया काँग्रेसची नैय्या पार करणार?बिहारमध्ये काँग्रेसची स्थिती फारशी चांगली नाही. राज्यात काँग्रेसचे केवळ १९ आमदार आहेत. बिहारमध्ये काँग्रेसची राष्ट्रीय जनता दल आणि डाव्या पक्षांसोबत युती आहे. मात्र गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी चांगली झाली नाही. त्या तुलनेत मित्रपक्षांनी चांगली कामगिरी केली. कन्हैया कुमार सातत्यानं भाजपवर टीका करतात. त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा काँग्रेसला होऊ शकतो. त्यांचं वत्कृत्व उत्तम आहे. त्यांची भाषणं व्हायरल होतात. त्यांच्या रॅलीला मोठी गर्दी असते. तरुणाईत त्यांचा प्रभाव आहे. 

गुजरातमध्ये मेवाणी देणार काँग्रेसला हात?वरिष्ठ नेते अहमद पटेल यांच्या निधनानंतर गुजरातमध्ये काँग्रेससमोर नेतृत्त्वाचा प्रश्न उभा राहिला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत राजीव पटेल यांनी उत्तम काम केलं होतं. सातव यांच्यामुळेच काँग्रेसनं भाजपला जबरदस्त टक्कर दिली. मात्र त्यांचंदेखील निधन झाल्यानं गुजरातमध्ये पक्ष अडचणीत सापडला आहे. 

जिग्नेश मेवाणी दलित समाजातील एक प्रमुख चेहरा आहेत. त्यांच्याविरुद्ध विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं उमेदवार दिला नव्हता. मेवाणींचा काँग्रेस प्रवेश आधीच झाला असता. त्यासाठीची बोलणी अहमद पटेल यांच्याकडून सुरू होती. मात्र त्यांचं अचानक निधन झालं. त्यामुळे मेवाणी आणि काँग्रेसमधील संवादाला काहीसा ब्रेक लागला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसJignesh Mevaniजिग्नेश मेवानीkanhaiya kumarकन्हैय्या कुमारBiharबिहारGujaratगुजरात