शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

फोन टॅपिंग प्रकरण: सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांमार्फत चौकशी हवी; कमलनाथ यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 05:40 IST

देशात पेगॅसस तंत्रज्ञानाद्वारे झालेल्या फोन टॅपिंग प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयातील विद्यमान न्यायाधीशाकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : देशात पेगॅसस तंत्रज्ञानाद्वारे झालेल्या फोन टॅपिंग प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयातील विद्यमान न्यायाधीशाकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी केली आहे. पेगॅसस प्रकरणी वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी काँग्रेस नेते शशी थरुर यांच्या अध्यक्षतेखालील माहिती-तंत्रज्ञानविषयक संसदीय स्थायी समिती केंद्र सरकारकडून माहिती मागविणार आहे. 

पेगॅसस तंत्रज्ञानाद्वारे काँग्रेस नेते राहुल गांधी, दोन केंद्रीय मंत्री, निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यापासून अनेक पत्रकारांच्या मोबाइल फोनवर पाळत ठेवण्यात आल्याच्या प्रकरणावरून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधकांनी गदारोळ माजविला होता. काँग्रेस नेते कमलनाथ म्हणाले की, पेगॅसस प्रकरण हा नागरिकांच्या खासगीपणावर मोठा घाला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयातील विद्यमान न्यायाधीशांकडून चौकशी होणे आवश्यक आहे. आम्ही पेगॅससचा वापर केलेला नाही असे प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल करायला हवे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१७ साली इस्रायलला भेट दिली. त्यानंतर फोन टॅपिंग सुरु झाले. 

कर्नाटकातील जनता दल (सेक्यूलर) व काँग्रेस आघाडी सरकार उलथविण्यासाठीही पेगॅसस तंत्रज्ञानाचा वापर केला होता असे गंभीर आरोपही कमलनाथ यांनी केले. पेगॅसस तंत्रज्ञान प्रकरणाबाबत काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या अध्यक्षतेखालील माहिती तंत्रज्ञानविषयक संसदेची स्थायी समिती येत्या २८ जुलै सविस्तर चर्चा करणार आहे. पेगॅससबाबत केंद्रीय माहिती-तंत्रज्ञान खाते, गृहखाते, दूरसंचार खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना समितीसमोर पाचारण करण्यात येईल.

भाजप देश उद्ध्वस्त करण्याची शक्यता – बॅनर्जी

- पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, आमच्या फोनचे टॅपिंग होत आहे. पेगॅससचे प्रकरण अतिशय गंभीर स्वरुपाचे आहे. काही लोकांवर पाळत ठेवण्यासाठी खूप पैसे खर्च केले जात आहेत. 

टॅग्स :ParliamentसंसदShashi Tharoorशशी थरूरcongressकाँग्रेस