पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार धडाक्यात सुरू आहे. सर्वच पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या 'क्लृप्त्या' शोधत आहेत. यातच, सध्या चर्चा सुरू आहे ती, 'हृदय माझे काबा आणि नयने मदीना' (हृदयात काबा आणि डोळ्यांत मदीना) या गाण्याची. खरेतर, तृणमूल काँग्रेसच्या (TMC) खासदार सायनी घोष प्रचार सभांदरम्यान हे गाणे गाऊन मुस्लिमांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहेत. सोशल मीडियावर या गाण्याच्या रील जबरदस्त व्हायरल होत आहेत.
दुसऱ्या बाजूला, भाजप याला 'मुस्लिम तुष्टीकरणाचा कळस' म्हणत आहे. अनेक जण या गाण्याचे व्हिडिओ शेअर करत, हिंदूंनी जागे होण्याची गरज आहे. काली आणि दुर्गा मातेची पूजा होणाऱ्या बंगालमध्ये एक खासदार मंचावर काबा आणि मदिनाचे गाणे का गात आहेत?
खासदार सायनी घोष या व्यवसायाने अभिनेत्री आहेत. त्यांनी अनेक बांग्ला चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. त्यांनी २०२१ मध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यानंतर २०२४ मध्ये त्यांनी जादवपूर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला. यापूर्वी, २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना आसनसोल दक्षिणमधून पराभवाचा सामना करावा लागला होता. अभिषेक बॅनर्जी यांच्यानंतर त्यांना टीएमसीच्या यूथ विंगचे अध्यक्षपद देण्यात आले. यावरून त्या ममता बॅनर्जींच्या किती जवळच्या आहेत हे समजते.
"बंगाल दाखवेल - ममताची क्षमता" -सायनी घोष सातत्याने काही ना काही वादामुळे चर्चेत राहतात. २०२२ च्या शिक्षक भरती घोटाळ्यात ईडीने त्यांची ११ तास चौकशी केली होती. सध्या त्या आपल्या गायन कौशल्याचा वापर राजकीय व्यासपीठावर करत असून, विशेषतः मुस्लीम बहुल भागात वातावरण निर्मितीसाठी या गाण्याचा वापर केला जात आहे. "बंगाल दाखवेल - ममताची क्षमता" अशी घोषणाही त्यांनी दिली आहे. भाजपकडून यावर हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून त्यांना लक्ष्य केले जात आहे.
Web Summary : TMC MP Saini Ghosh's 'Kaaba Madina' song during West Bengal election rallies draws criticism. BJP alleges Muslim appeasement as Ghosh, an actress-turned-politician, aims to woo Muslim voters. Her past controversies, including a teacher recruitment scam probe, resurface amidst the political storm.
Web Summary : पश्चिम बंगाल चुनाव रैलियों में टीएमसी सांसद सायनी घोष के 'काबा मदीना' गाने पर विवाद। भाजपा ने मुस्लिम तुष्टीकरण का आरोप लगाया। अभिनेत्री से नेता बनीं घोष का उद्देश्य मुस्लिम मतदाताओं को आकर्षित करना है। शिक्षक भर्ती घोटाले की जांच सहित उनके पिछले विवाद फिर से सामने आए।