Jyoti Malhotra : "माझ्याकडे पैसे नाहीत..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांनी सरकारकडे केली 'ही' मोठी मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 17:58 IST2025-05-22T17:57:59+5:302025-05-22T17:58:45+5:30
Jyoti Malhotra : पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या ज्योती मल्होत्राच्या वडिलांनी सरकारकडे मोठी मागणी केली आहे.

Jyoti Malhotra : "माझ्याकडे पैसे नाहीत..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांनी सरकारकडे केली 'ही' मोठी मागणी
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या ज्योती मल्होत्राच्या वडिलांनी सरकारकडे मोठी मागणी केली आहे. सरकारने वकील उपलब्ध करून द्यावा असं म्हटलं आहे. पोलिसांनी ज्योतीची डायरी काढून घेतली आहे. ज्योती त्या डायरीत काय लिहायची हे माहित नाही असंही वडिलांनी म्हटलं आहे.
ज्योतीचे वडील हरीश मल्होत्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, "ज्योतीला पोलिसांनी संशयाच्या आधारे अटक केली आहे. तिला न्यायालयात हजर केलं जाईल. माझ्याकडे वकील नेमण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत. मी सरकारला आम्हाला वकील उपलब्ध करून देण्याची विनंती करतो."
पहलगाम हल्ल्यादरम्यान कोणाच्या संपर्कात होती? ज्योती मल्होत्राबद्दल खळबळजनक खुलासा
" मी गरीब आहे"
"संशय कशाबद्दल आहे हे मला माहित नाही. मला हे सांगण्यात आलेलं नाही. मला सरकारी वकील हवा आहे. मी गरीब आहे. जर सरकारने मला वकील दिला तर मी खूप आभार मानेन. पोलिसांकडे ज्योतीचे सर्व फोन आहेत."
४ वेळा मुंबईला गेलेली ज्योती मल्होत्रा; गर्दीच्या ठिकाणांचे फोटो आणि व्हिडीओ कोणाला पाठवले?
"ज्योतीने एका कागदावर औषधं लिहून ठेवली होती. ती माझ्या मोठ्या भावाची पप्पूची औषधं होती. पोलिसांनी एक डायरी काढून घेतली आहे, मला माहित नाही की ती त्यात काय लिहित होतं. कधी कधी ती बाहेर गेल्यावर एका दिवसात परत यायची."
"मी आजारी आहे"
"मी दिल्लीला जात आहे असं सांगून जायची. माझ्याकडे एक छोटा फोन आहे, मी व्हिडीओ पाहत नाही. मी आजारी आहे. मला चालता येत नाही. माझा कोणी नातेवाईक नाही, कोणी शेजारीही नाही. गेल्या तीन-चार दिवसांपासून माझी तब्येत बिघडली आहे" असं ज्योतीच्या वडिलांनी म्हटलं आहे.