शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतातील एकमेव व्यक्ती, ज्यांचा थेट देवाशी संपर्क", राहुल गांधींची PM मोदींवर बोचरी टीका
2
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीची घरात घुसून हत्या; चोरांकडून कृत्य की ओळखीच्या व्यक्तीकडूनच घात?
3
"इंडिया आघाडी तीन कट रचतेय", घोसीत PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
4
ENG vs PAK : ...म्हणूनच पाकिस्तानचा पराभव होतोय; माजी खेळाडूनं सांगितली मैदानाबाहेरील गोष्ट
5
कल्याणमधील 'तो' अ‍ॅसिड हल्ला बनावट; UPSC करणाऱ्या तरुणीचे बिंग पोलिसांनी 'असं' फोडलं
6
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
7
Rajkot Game zone Fire Accident: 'डेथ फॉर्म' भरलात तरच तुम्हाला प्रवेश मिळेल, गेम झोन मालकांनी ठेवली होती ही अट; राजकोट दुर्घटनेवर मोठा खुलासा
8
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
9
पॅट कमिन्सकडून एका 'ऑटो राईड'चे श्रेयस अय्यरने मागितले २० कोटी; फायनलपूर्वीचा मजेशीर Video 
10
"मुलाच्या आईने भावनिक होऊन..."; आरोपीच्या ड्रायव्हरबाबत पुणे पोलिसांचा मोठा खुलासा
11
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
12
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
13
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."
14
विराट कोहली RCB च्या पराभवामुळे स्ट्रेसमध्ये? BCCI ला केली खास विनंती अन् म्हणूनच तो...  
15
आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण
16
MI ने दिले १५ कोटी, BCCI देते ५ कोटी, मुंबईत 8BHK फ्लॅट अन्...; हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती किती?
17
शरद पवार गटातील हुकूमशाही, अहंभावाला कंटाळले, ६ जूननंतर महायुतीत इन्कमिंग; शिंदे गटाचा दावा
18
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 
19
९९ रुपयांची स्कीम की मृत्यूचं निमंत्रण?; गेमिंग झोनच्या भयंकर आगीत ३५ जीव गेले
20
विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त स्मृतिस्थळावर पोहचले संपुर्ण देशमुख कुटुंब, वडिलांसाठी रितेशनं शेअर केली भावुक पोस्ट

न्या. शरद बोबडे सरन्यायाधीशपदी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 3:32 AM

सर्वोच्च पदावर तिसरी मराठी व्यक्ती

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठतम न्यायाधीश आणि नागपूरचे सुपुत्र न्या. शरद अरविंद बोबडे यांनी सोमवारी भारताच्या सरन्यायाधीशपदाची सूत्रे स्वीकारली. न्या. बोबडे १७ महिने म्हणजे २३ एप्रिल, २०२१ पर्यंत हे पद भूषवतील. न्या. प्रल्हाद गजेंद्रगडकर व न्या. यशवंत चंद्रचूड यांच्यानंतर हे तिसरे मराठी सरन्यायाधीश आहेत.राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी न्या. बोबडे यांना सरन्यायाधीशपदाची शपथ दिली. न्या. बोबडे यांनी ईश्वराला स्मरून शपथ घेतली. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, अनेक केंद्रीय मंत्री, माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी व माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. न्या. बोबडे यांच्या ९१ वर्षांच्या मातोश्री श्रीमती मुक्ता बोबडे प्रकृती बरी नसूनही मुलाच्या आयुष्यातील अत्युच्च मानाचा क्षण डोळ्यांत साठविण्यासाठी उपस्थित होत्या. शपथविधीनंतर न्या. बोबडे यांनी आई श्रीमती मुक्ता यांचे पदस्पर्श करून आशीर्वाद घेतले. त्यावेळी त्या भावनाविवश झाल्या होत्या. न्या. बोबडे यांच्या रुक्मिणी व सावित्री या कन्या आणि चिरंजीव श्रीनिवास यांनी वडिलांचे अभिनंदन केले.न्या. बोबडे यांचे अनेक मित्र, चाहते व महाराष्ट्रातून गेलेल्या वकील मंडळीपैकी अनेकांना राजशिष्टाचाराच्या बंधनांमुळे शपथविधीला हजर राहता आले नाही. त्यांनी रविवारी व आज न्यायालयात, तसेच घरी जाऊन त्यांचे अभिनंदन केले.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय