पत्रकार जहांगीर पोचा यांचे निधन

By Admin | Updated: July 13, 2014 00:59 IST2014-07-13T00:59:18+5:302014-07-13T00:59:18+5:30

विविध मीडिया संस्थांमध्ये कार्यरत राहिलेले ज्येष्ठ पत्रकार जहांगीर पोचा यांचे शनिवारी पहाटे दिल्लीजवळच्या गुडगाव येथे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते 46 वर्षाचे होते.

Journalist Jahangir Pocha passes away | पत्रकार जहांगीर पोचा यांचे निधन

पत्रकार जहांगीर पोचा यांचे निधन

नवी दिल्ली : विविध मीडिया संस्थांमध्ये कार्यरत राहिलेले ज्येष्ठ पत्रकार जहांगीर पोचा यांचे शनिवारी पहाटे दिल्लीजवळच्या गुडगाव येथे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते 46 वर्षाचे होते.
‘न्यूज एक्स’ या वृत्त वाहिनीचे ते मुख्य संपादक आणि ही वृत्तवाहिनी चालविणा:या आयटीव्ही समूहाचे ज्येष्ठ संपादकीय सदस्य होते. शनिवारी छातीत दुखत असल्याची तक्रार त्यांनी केली. यानंतर त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे पहाटे 4.3क् वाजता त्यांचे निधन झाले.
पोचा यांनी यापूर्वी ‘बिझनेस वर्ल्ड’चे संपादक आणि ‘बोस्टन ग्लोब’चे चीनमधील प्रतिनिधी म्हणूनही काम केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोचा यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. (वृत्तसंस्था)

 

Web Title: Journalist Jahangir Pocha passes away