शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय मंत्री जितीन प्रसाद रस्ते अपघातात जखमी, डोक्याला दुखापत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2024 18:43 IST

Jitin Prasad Accident : केंद्रीय मंत्र्यांच्या गाडीला ताफ्यातील गाडी धडकली

Jitin Prasad Accident : केंद्रीय मंत्री जितीन प्रसाद हे रस्ता अपघातात जखमी झाले आहेत. जितीन प्रसाद हे उत्तर प्रदेशातील आपल्या पिलीभीत लोकसभा मतदारसंघात  दौऱ्यावर होते. यादरम्यान त्यांची गाडीची ताफ्यातील एका वाहनाला धडक बसली. या धडकेत जितिन प्रसाद यांच्यासह खासगी सचिवही जखमी झाले आहेत. ही घटना मझोला-विज्टी रोडवरील बहरुआ गावात घडली. जितीन प्रसाद यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद हे आपल्या लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांच्या ताफ्यातील एस्कॉर्ट गाडीने अचानक ब्रेक लावला. त्यानंतर मागून येणाऱ्या जितिन प्रसाद यांची गाडीही थांबली. मात्र त्यांच्या गाडीला मागून येणाऱ्या दुसऱ्या एस्कॉर्ट गाडीने धडक दिली. या घटनेत कारचे नुकसान झाले असून जितीन प्रसाद यांनाही किरकोळ दुखापत झाली. या घटनेनंतर जितीन प्रसाद हे खराब झालेले वाहन घटनास्थळी सोडून दुसऱ्या वाहनात कार्यक्रमासाठी रवाना झाले.

दरम्यान, जितिन प्रसाद हे आपल्या लोकसभा मतदारसंघातील पूरग्रस्त गावं आणि परिसरांना भेट आहेत. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष संजीव प्रताप सिंह, आमदार सुधीर गुप्ता आणि आमदार प्रकाश नंद यांची वाहनेही त्यांच्या ताफ्यात होती. अलीकडेच, अतिवृष्टीनंतर आलेल्या पुराने परिसरातील अनेक गावांना वेढले आणि तेथील जनजीवन विस्कळीत झाले. त्यामुळे जितिन प्रसाद हे पूरग्रस्त गावं आणि भागांची पाहणी करत आहेत. 

टॅग्स :AccidentअपघातUttar Pradeshउत्तर प्रदेश