पावसासाठी अक्कलकोट मंदिरात जलनिवास कार्यक्रम

By Admin | Updated: July 6, 2015 23:34 IST2015-07-06T23:34:22+5:302015-07-06T23:34:22+5:30

अक्कलकोट :

Jirivivas Program in Akkalkot temple for rain | पावसासाठी अक्कलकोट मंदिरात जलनिवास कार्यक्रम

पावसासाठी अक्कलकोट मंदिरात जलनिवास कार्यक्रम

्कलकोट :
येथील ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन मंदिरात जलनिवास करून धार्मिक कार्यक्रम झाला़ त्याप्रसंगी शेकडो भाविक सामील झाले होते़
पावसाने दडी मारल्याने नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे़ म्हणून अक्कलकोट शहरातील श्री मल्लिकार्जुन मंदिरात भाविकांनी पाऊस येऊ दे, असे साकडे घालत सोमवारी सकाळी लिंगस्वरूप श्री मल्लिकार्जुन महाकुंभास अभिषेक करून लिंगास जलनिवास केले़
जोपर्यंत अक्कलकोट तालुक्यात दमदार पाऊस पडणार नाही तोपर्यंत मल्लिकार्जुनास पाण्यात ठेवण्यात येणार असल्याचे शिवराज स्वामी यांनी सांगितले़ यावेळी नगरसेवक रामचंद्र समाणे, महेश हिंडोळे, शिवराज स्वामी, राजशेखर हिप्परगी, पाटील, वनकुद्रे आदी उपस्थित होते़

Web Title: Jirivivas Program in Akkalkot temple for rain