शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
2
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
3
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
4
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
5
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
6
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
7
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
8
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
9
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
10
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
11
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
12
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
13
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
14
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
15
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
16
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
17
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
18
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
19
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
20
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

Jio चा IndependenceDay धमाका; 5 महिने मोफत इंटरनेट, कॉलिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 8:52 AM

रिलायन्स जिओ (Reliance Jio) ने जन्माष्टमीच्या मुहूर्तावर एक जबरदस्त ऑफर लाँच केली आहे. या ऑफरनुसार JioPhone 2 ला केवळ 141 रुपयांच्या EMI वर खरेदी करता येणार आहे.

रिलायन्स जिओने भारताच्या 74 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ग्राहकांना विशेष ऑफर जाहीर केली आहे. JioFi 4G वायरलेस हॉटस्पॉट खरेदी केल्य़ानंतर ग्राहकांना पुढील 5 महिने मोफत डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग देण्यात येणार आहे. 

JioFi ची किंमत 1999 रुपये ठेवण्यात आली असून याचा फायदा उठविण्यासाठी आधी JioFi चा एखादा प्लॅन निवडावा लागणार आहे. रिलायन्स डिजिटल स्टोअरमधून JioFi हॉटस्पॉट खरेदी करावे लागणार आहे. यानंतर जिओ सिम अॅक्टिव्हेट झाले की ग्राहकांना डिव्हाईस कार्यरत करण्यासाठी तीनपैकी एक प्लॅन निवडावा लागणार आहे. JioFi मध्ये टाकलेले सिम सुरु झाले की पुढील तासापासून ही ५ महिन्यांची ऑफर लागू होणार आहे. अॅक्टिव्हेशन स्टेटस MyJio अॅपवर पाहता येणार आहे. कंपनीच्या वेबसाईटवरूनही JioFi हॉटस्पॉट खरेदी करता येणार आहे. 

रिलायन्स जिओचा सर्वाधिक परवडणारा प्लॅन 199 रुपयांचा आहे. यामध्ये रोज 1.5 जीबी डेटा मिळतो. याची वैधता 28 दिवसांची आहे. याशिवाय एक्स्ट्रा 99 रुपये दिल्यावर Jio Prime मेंबरशिप मिळते. डेटासह जिओ ते जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि अन्य नेटवर्कवर 1000 मिनिट दिले जात आहेत. तसेच 100 एसएमएस पाठविता येणार आहेत. 

दुसरा प्लॅन 249 रुपयांचा असून त्यामध्ये रोज 2 जीबी डेटा दिला जात आहे. तसेच व्हॅलिडिटी 28 दिवसांची आहे. अन्य सुविधा 199 प्लॅन सारख्याच आहेत. तिसरा प्लॅन 349 रुपयांचा आहे. रोज 3 जीबी डेटा दिला जातो. यामध्ये मोफत कॉलिंग, एसएमएस सारखे फायदे आहेत. नव्या ऑफरनुसार 5 महिने मोफत डेटा, अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे. 

 

रिलायन्स जिओ (Reliance Jio) ने जन्माष्टमीच्या मुहूर्तावर एक जबरदस्त ऑफर लाँच केली आहे. या ऑफरनुसार JioPhone 2 ला केवळ 141 रुपयांच्या EMI वर खरेदी करता येणार आहे. या फोनची किंमत 2999 रुपये असून 2018 मध्ये लाँच करण्यात आला होता. याआधी कंपनीने 2017 मध्ये पहिला फिचरफोन जियोफोन (JioPhone) बाजारात आणला होता.  JioPhone 2 ची किंमत 2999 रुपये आहे. या फोनला आता कंपनी अधिकृत वेबसाईटवर 141 रुपयांच्या ईएमआयद्वारे विकत आहे. या फोनमध्ये 2.4 इंचाचा डिस्प्ले, 2000 एमएएचची बॅटरी, 4जी, क्वार्टी की पॅड आहे. याचसोबत 512 एमबीची रॅम आणि 4 जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. हे स्टोरेज मेमरी कार्डद्वारे 128 जीबी वाढविता येते. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

आजचे राशीभविष्य - 15 ऑगस्ट 2020; जुने येणे वसूल होईल

IndependenceDay लाल किल्ल्यावरून कोरोना योद्ध्यांना नमन; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण

टॅग्स :JioजिओIndependence Dayस्वातंत्र्य दिनReliance Jioरिलायन्स जिओ