Prime Minister Narendra Modi unfurls the National Flag at Red Fort on IndependenceDay | IndependenceDay लाल किल्ल्यावरून कोरोना योद्ध्यांना नमन; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण

IndependenceDay लाल किल्ल्यावरून कोरोना योद्ध्यांना नमन; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण

नवी दिल्ली : आज देशाचा 74 वा स्वातंत्र्य दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर जात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. यानंतर लाल किल्ल्यावर येत ध्वजारोहण केले. 


पंतप्रधान मोदी यांनी यानंतर देशवासियांना संबोधित केले. देशवासिय आज अनेक संकटांसोबत लढत आहेत. कोरोना, पूर, भूस्खलन आदी संकटांमध्ये अनेकांनी जीव गमावला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना आम्ही मदत करत आहोत. तसेच राज्यांवरील आपत्तीवर केंद्र सरकार मिळून मदत करत आहे, असे मोदी म्हणाले. 
यावेळी लहान मुलं लाल किल्ल्यावर दिसत नाहीत, कोरोनाने सर्वांची वाट अडवली, 'सेवा परमो धर्म' मानणाऱ्या सर्व कोरोना योद्ध्यांना नमन. कोरोनाच्या संकटात आपल्या जीवाची पर्वा न करता, डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, अॅम्ब्युल्स कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलीस कर्मचाऱ्यांसह अनेक लोक 24 तास सातत्याने काम करत आहेत, असे मोदी म्हणाले. 

जगाला भारताकडून उत्सुकता आणि अपेक्षा आहेत. आम्ही आत्मनिर्भर बनलो तर जगाला काहीतरी देऊ शकतो. जगाला कच्चा माल देऊन आम्ही किती दिवस पक्का माल खरेदी करणार आहोत? एके काळी परदेशातून गहू आयात केले जात होते. आज शेतकऱ्यांनी गहू भारतातच उत्पादित केला. गरजा पूर्ण झाल्या आणि इतर देशांना तो पाठविला जातो. कृषी क्षेत्राला कायद्यातून मुक्त केला, असे मोदी म्हणाले.

अंतराळ क्षेत्रात भारत आत्मनिर्भर होतो, तेव्हा शेजाऱ्यांनाही त्याचा फायदा होतो. ऊर्जा क्षेत्र, आरोग्य क्षेत्रात आत्मनिर्भर झाल्यास भारत जगाचे हेल्थ डेस्टिनेशन बनेल. कोरोना संकटात 'आत्मनिर्भर भारत' हा 130 कोटी भारतीयांसाठी मंत्र बनला आहे. 'आत्मनिर्भर भारत' हे स्वप्न प्रत्यक्षात येणारच. देशातील तरुण, महिला शक्तीवर माझा पूर्ण विश्वास असल्याचे मोदी म्हणाले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Prime Minister Narendra Modi unfurls the National Flag at Red Fort on IndependenceDay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.