शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

झारखंडकडे गुजरातला मागे टाकण्याची क्षमता - नरेंद्र मोदी

By admin | Updated: August 21, 2014 16:42 IST

झारखंडकडे देशातील सर्वाधिक विकसित राज्य बनण्याची, विकासात गुजरातलाही मागे टाकण्याची क्षमता आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला.

ऑनलाइन लोकमत

रांची, दि. २१ - नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असलेल्या झारखंडकडे देशातील सर्वाधिक विकसित राज्य बनण्याची ताकद आहे, क्षमतांचा पूरेपूर वापर केल्याल विकासात झारखंड गुजरातलाही मागे टाकेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यक्त केला. रांची येथे पॉवर ग्रीड उद्धाटन समारंभात ते बोलत होते. जनेतेने भरघोस मतदान करून बहुमताने पक्षाला लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून दिल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. जनतेने जो विश्वास दाखवला, जे प्रेम दिले ते विकासाच्या माध्यमातून सव्याज परत करेन असे आश्वासन त्यांनी दिले.
झारखंडमध्ये विकासाची क्षमता आहे, मात्र त्याचा अद्याप सर्वात जास्त उपयोग झालेला नाही. वीजनिर्मितीद्वारे झारखंड फक्त स्वत:च्या राज्यातील नव्हे तर संपूर्ण देशातील अंधार दूर करून भले करू शकतो असे ते म्हणाले. राज्यांना उपेक्षित ठेवून देशाचा विकास होऊ शकत नाही असे सांगत चारही दिशातील सर्व राज्यांचा विकास झाल्यास भारताचा संतुलित विकास होईल, असेही ते म्हणाले. तसेच देशाच्या पूर्व भागातील राज्यांमध्ये विकास कामांना भरपूर वाव असल्याचे त्यांनी सांगितले. 
झारखंड राज्य निर्माण होऊन १४ वर्षांचा कालावधी लोटला आहे, सध्या हे राज्य महत्वाचा अवस्थेत आहे. आत्ता जर त्याच्या विकासाकडे नीट लक्ष दिले तर या राज्याचा कायापालट होऊ शकतो, त्यासाठी मेहनत, कामातील सातत्य व प्रामाणिकपणाची गरज असल्याचे मत मोदींनी व्यक्त केले.