विरोधी पक्ष नेतेपदाकरिता जदयूचा काँग्रेसला पाठिंबा

By Admin | Updated: June 14, 2014 03:28 IST2014-06-14T03:28:52+5:302014-06-14T03:28:52+5:30

लोकसभेत विरोधी पक्ष नेतेपदासाठी काँग्रेसला जनता दल युनायटेडने आपला पाठिंबा दिला असून, सरकारने मात्र या संदर्भात अद्याप मौन बाळगले आहे.

JD (U) 's support for the Leader of the Opposition | विरोधी पक्ष नेतेपदाकरिता जदयूचा काँग्रेसला पाठिंबा

विरोधी पक्ष नेतेपदाकरिता जदयूचा काँग्रेसला पाठिंबा

नवी दिल्ली : लोकसभेत विरोधी पक्ष नेतेपदासाठी काँग्रेसला जनता दल युनायटेडने आपला पाठिंबा दिला असून, सरकारने मात्र या संदर्भात अद्याप मौन बाळगले आहे.
जदयूचे सरचिटणीस के.सी. त्यागी यांच्या मते, बिहारमध्ये अशाच परिस्थितीत आमच्या पक्षाने राष्ट्रीय जनता दलाचे नेते अब्दुल बारी सिद्दीकी यांना विधानसभेत विरोधी पक्ष नेतेपदाचा दर्जा दिला होता ज्यावेळी राजदकडे त्यासाठी दावा करण्याइतपत संख्याबळही नव्हते. केंद्रात याची गरज अधिक आहे. सरकारला अनेक संवैधानिक प्रक्रियेतून जावे लागणार आहे. विरोधी पक्षनेत्याच्या अनुपस्थितीत त्या प्रक्रियांना दुसरे कोणीही पूर्ण करू शकणार नाही. यासाठी आम्ही काँग्रेस नेत्यांना विरोधी पक्ष नेतेपदाचा दर्जा दिला जावा, अशी मागणी करतो असे ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)

 

Web Title: JD (U) 's support for the Leader of the Opposition