शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

जवाहरलाल दर्डा शालेय फुटबॉल

By admin | Updated: December 18, 2014 00:40 IST

जवाहरलाल दर्डा स्मृती शालेय फुटबॉल स्पर्धा

जवाहरलाल दर्डा स्मृती शालेय फुटबॉल स्पर्धा
बीव्हीएमच्या विजयात साहिलचे दोन गोल
नागपूर: साहिलने नोंदविलेल्या दोन गोलमुळे श्रीकृष्णनगर येथील भारतीय विद्या भवन्स संघाने बुधवारी जवाहरलाल दर्डा स्मृती शालेय फुटबॉल स्पर्धेत जैन इंटरनॅशनल स्कूलचा ४-० ने पराभव केला. नागपूर जिल्हा फुटबॉल संघटनेतर्फे अजनीच्या मध्य रेल्वे मैदानावर आयोजित ही स्पर्धा लोकमत मीडिया प्रा. लिमिटेडने पुरस्कृत केली आहे.
या सामन्यातील मध्यांतरापर्यंतचा खेळ निरस झाला. उत्तरार्धात मात्र बीव्हीएमने आक्रमक खेळ करीत अखेरच्या २२ मिनिटांत तब्बल चार गोल मारले. उत्कर्ष धापोडकरने खाते उघडल्यानंतर मयूर कातुरेने ४३ व्या मिनिटाला दुसरा गोल केला. साहिलने नंतर ६७ आणि ८० व्या मिनिटांना लागोपाठ दोन गोल केले.
दुसऱ्या सामन्यात दाभा येथील सेंटर पॉईंट संघाने सेंट ॲन्नेस शाळेचा २-० ने पराभव केला. मध्यांतराला खेळ थांबला त्यावेळी दाभा संघ १-० ने आघाडीवर होता.श्रेयस बोरा याने सातव्या मिनिटाला गोल केला. सामना संपायला एक मिनिटांचा अवधी असताना कुणाल खंडेलवाल याने संघाचा दुसरा गोल नोंदवित विजयावर शिक्कामोर्तब केले.
तिसऱ्या सामन्यात मौन्टफोर्ट स्कूलने सेंट झेव्हियर्स हिंगणा संघावर १-० ने विजय साजरा केला. सामन्यात निर्णायक ठरलेला गोल ४७ व्या मिनिटाला गौरव कोठारी याने नोंदविला.
उद्या गुरुवारी सकाळी ८ वाजेपासून अंजूमन हायस्कूलविरुद्ध भवन्स श्रीकृष्णनगर, के. जॉन पब्लिक स्कूलविरुद्ध राजेंद्र हायस्कूल आणि सीपीएस दाभाविरुद्ध सेंट जॉन्स स्कूल हे सामने खेळविले जातील.(क्रीडा प्रतिनिधी)
..........................................................................
नागपूर सिटीची विजयी सलामी
एनडीएफएद्वारा याच मैदानावर खेळविल्यात आलेल्या ज्युनियर साखळी सामन्यात नागपूर सिटी संघाने न्यू ईरा फुटबॉल क्लबचा ३-० ने पराभव करीत विजयी सलामी दिली. विजयी संघाकडून हितेश हारोडे ३६व्या, तौफिक शेख याने ५० व्या आणि सुमित गावंडेने ५८ व्या मिनिटाला गोल नोंदविले. उद्या गुरुवारी या गटात सिटी एफसीविरुद्ध बिगबेन हा सामना दुपारी १ पासून तसेच बिरसा मुंडा क्लबविरुद्ध क्रीडा मंडळ गुमगाव हा सामना दुपारी २.३० पासून खेळविला जाईल.
.....................................................................