जम्मू काश्मीर : अनंतनागमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, दोन दहशतवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2018 08:44 AM2018-07-25T08:44:21+5:302018-07-25T14:45:58+5:30

अनंतनागमध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी परिसराला घेराव घालत शोधमोहीम सुरू केली.

jammu kashmir anantnag search operation terrorist | जम्मू काश्मीर : अनंतनागमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर : अनंतनागमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, दोन दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर - जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनंतनागमध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी परिसराला घेराव घालत शोधमोहीम सुरू केली. यावेळी दहशतवाद्यांनी जवानांवर ग्रेनेड हल्ला केला. त्यास जवानांनी चोख प्रत्युत्तरदेखील दिले. परिसरात सध्या चकमक सुरू आहे. दरम्यान, दहशतवाद्यांची नेमकी संख्या अद्यापपर्यंत समोर आलेली नाही. 



 

दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळताच जम्मू काश्मीर पोलीस, आर्मी आणि सीआरपीएफ यांनी बुधवारी सकाळपासूनच हे सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. काही वेळेसाठी या परिसरात ये-जा करण्यासही मनाई करण्यात आली आहे. श्रीनगरच्या बनिहालकडे जाणारी रेल्वे सेवाही ठप्प झाली आहे. तसेच भागातील मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.


अनंतनागच्या लाल चौक परिसरात राहणाऱ्या लोकांनी पहाटे 4 वाजता बॉम्ब आणि गोळीबाराचा आवाज ऐकल्याची माहिती दिली. त्यानंतर भारतीय जवानांनी हा परिसर घेरला आणि दहशतवाद्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. लपलेले दोन ते तीन दहशतवादी हे लश्कर ए तोयबाचे असल्याची  शक्यता व्यक्त केली जात आहे. याआधीही जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये मंगळवारी दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या गस्ती पथकावर हल्ला केला होता. यामध्ये एक जवान शहीद झाला असून दोन जवान जखमी झाले होते.


 

Web Title: jammu kashmir anantnag search operation terrorist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.