शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

"मग इंडिया आघाडी बंद करुन टाका"; दिल्लीतल्या आप आणि काँग्रेसच्या वादावर ओमर अब्दुलांचे स्पष्ट मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 13:25 IST

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी इंडिया विरोधी आघाडीवर प्रश्न उपस्थित केले आहेत

Omar Abdullah on INDI alliance: गेल्या काही दिवसांपासून इंडिया आघाडीच्या नेत्यांमध्ये मतभेद असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीतही त्याचा प्रत्यय आला. ममता बॅनर्जी, अखिलेश यादव आणि तेजस्वी यादव यांच्यानंतर आता जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी इंडिया आघाडीच्या भवितव्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. इंडिया आघाडीची एकही बैठक होत नाही हे दुर्दैव आहे. असं असेल तर इंडिया आघाडी बंद करुन टाका असं ओमर अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे. इंडिया आघाडीच्या दिल्लीतल्या गोंधळावरही  ओमर अब्दुल्ला यांनी भाष्य केलं.

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात सुरू असलेल्या वादामुळे इंडिया आघाडीमध्ये मोठी फूट पडताना दिसत आहे. अशातच जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी इंडिया आघाडी प्रश्न उपस्थित केले आहेत. ही आघाडी केवळ संसदेच्या निवडणुकीपुरती मर्यादित राहिली असेल, तर ती विसर्जित केली पाहिजे, असे ओमर अब्दुल्ला म्हणाले.

"दिल्लीत काय चालले आहे यावर मी काहीही बोलू शकत नाही कारण आमचा दिल्लीच्या निवडणुकीशी काहीही संबंध नाही. आम आदमी पार्टी, काँग्रेस आणि तिथे असलेल्या इतर पक्षांनी भाजपचा मुकाबला कसा करता येईल हे ठरवावे. याआधी तिथे आम आदमी पार्टीला सलग दोनदा यश मिळाले होते. त्यामुळे जनतेला निर्णय घ्यावा लागेल," असं ओमर अब्दुल्ला म्हणाले.

"मला आठवत आहे त्यानुसार, इंडिया आघाडीसाठी कोणतीही कालमर्यादा निश्चित केलेली नव्हती. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे इंडिया आघाडीची एकही बैठक होत नाहीये. त्यामुळे आघाडीचे नेतृत्व, अजेंडा आणि अस्तित्व याबाबत स्पष्टता नाही. कदाचित दिल्लीच्या निवडणुका संपल्यानंतर इंडिया आघाडीतील सर्व पक्षांना बोलवले जाईल. जर ही आघाडी लोकसभेच्या निवडणुकीपुरती मर्यादित असेल तर त्यांनी ती संपवायला हवी. विरोधी पक्षांमध्ये ऐक्याचा अभाव स्पष्टपणे दिसून येत आहे," असंही ओमर अब्दुल्ला म्हणाले.

दरम्यान, दिल्ली निवडणुकीबाबत आप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु असताना ओमर अब्दुल्ला यांनी हे विधान केले आहे. त्यामुळे विरोधी इंडिया आघाडीच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. भाजपविरुद्ध विरोधकांना एकत्र करण्यासाठी इंडिया आघाडीची स्थापना करण्यात आली होती. मात्र गेल्या काही काळात विविध पक्षांमध्ये मतभेद निर्माण झाले असून त्यामुळे इंडिया आघाडीचे भविष्य धोक्यात आलं आहे.

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकOmar Abdullahउमर अब्दुल्लाcongressकाँग्रेस