बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 10:21 IST2025-11-08T10:21:00+5:302025-11-08T10:21:44+5:30
जयपूरमधील एका प्रतिष्ठित शाळेची विद्यार्थिनी असलेल्या ९ वर्षांच्या अमायराने शाळेच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली.

बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
जयपूरमधील एका प्रतिष्ठित शाळेची विद्यार्थिनी असलेल्या ९ वर्षांच्या अमायराने शाळेच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली. यामध्ये तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी आता तिच्या आईने मोठा खुलासा केला आहे. "मला शाळेत जायचं नाही, प्लीझ पाठवू नका..." असं अमायरा तिच्या आईला सांगत होती. आई शिवानीने याचं ऑडिओ रेकॉर्डिंग सर्वांना दाखवलं. शिवानीने दिलेल्या माहितीनुसार, शाळेला याबाबत माहिती देण्यात आली होती, पण त्यांनी दुर्लक्ष केलं.
गेल्या वर्षभरापासून जयपूरच्या नीरजा मोदी शाळेतील ९ वर्षांच्या अमायराचे पालक शाळेतील शिक्षकांकडे तक्रार करत होते की, काही मुलं अमायराची छेड काढतात, तिला टोमणे मारतात आणि तिची चेष्टा करतात. शाळेतील शिक्षकांशी अनेक वेळा बोलले, पण ते दुर्लक्ष करत राहिले. अमायराच्या वडिलांनी देखील मीटिंगमध्ये याबाबत माहिती दिली होती. अमायराने तिला त्रास देणाऱ्या काही मुलांची नावं सांगितली होती.
जयपुर के नीरजा मोदी स्कूल में 4थी मंजिल से कूदी थी 9 साल की छात्रा अमायरा, घटना का CCTV कैद.
— Arjun Chaudharyy (@Arjun5chaudhary) November 2, 2025
लाइव वीडियो pic.twitter.com/cVvKL41ndN
शिक्षिकेने पालकांना सांगितलं की, शाळेत अमायराने सर्व विद्यार्थ्यांशी, अगदी मुलांशीही बोलायला शिकले पाहिजे. त्यावर पालकांनी शिक्षिकेला मुलांशी बोलायचं की नाही हा माझ्या मुलीचा निर्णय आहे असं देखील म्हटलं होतं. अमायराला बुलिंगचा त्रास झाला होता. परंतु शाळेने कधीही हा मुद्दा गांभीर्याने घेतला नाही. त्यामुळेच अमायराने टोकाचा निर्णय घेतला.
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video
शिवानी म्हणते की, "आम्ही पुढच्या वर्षी तिला दुसऱ्या शाळेत टाकण्याचा निर्णय घेतला होता. माझ्या मुलीला सेंट झेवियर्स शाळेत प्रवेश देण्यासाठी मी स्थानिक आमदार राज्यवर्धन सिंह राठोड यांच्याशीही बोलले. पण ते होऊ शकलं नाही." अमायराने उडी मारल्यानंतर शाळा प्रशासनाने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे प्रकरण आणखी गंभीर झालं.