J-K: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; 3 दहशतवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2024 20:56 IST2024-07-14T20:55:59+5:302024-07-14T20:56:24+5:30

सध्या परिसरात शोध मोहिम राबवली जात आहे.

J-K: attempt to enter in india from Jammu and Kashmir's Kupwara; 3 terrorists killed | J-K: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; 3 दहशतवाद्यांचा खात्मा

J-K: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; 3 दहशतवाद्यांचा खात्मा

Jammu-Kashmir : पाकिस्तानी दहशतवादी सातत्याने भारतात घुसण्याचा प्रयत्न करतात. रविवारी(दि.14) देखील कुपवाडा येथील केरन सेक्टरमध्ये काही दहशतवाद्यांनी भारतीय सीमेत घुसण्याचा प्रयत्न केला, पण आपल्या सैन्याने हा प्रयत्न हाणून पाडला. यादरम्यान भारतीय सैन्याने 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला. कारवाई अजूनही सुरुच असून, या भागात शोध मोहिम राबवली जात आहे.

याआधी गुरुवारी लष्कराने जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये अशाच प्ररकारचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला होता. रात्रीच्या वेळी संशयित दहशतवाद्यांचा एक गट भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत होता, परंतु भारतीय सैन्याने गोळीबार सुरू केल्यानंतर त्यांनी पळ काढला. 

सैन्याच्या वाहनावर ग्रेनेड हल्ला 
दरम्यान, सोमवारी कठुआमध्ये दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर ग्रेनेडने हल्ला केला होता, ज्यात पाच जवान शहीद झाले. यानंतर लष्कराने संपूर्ण परिसराला वेढा घातला आणि शोध मोहीम सुरू केली. यादरम्यान सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकही झाली. यापूर्वी वैष्णव देवीला जाणाऱ्या भाविकांच्या बसवर गोळीबाराची घटना घडली होती. तेव्हापासून खोऱ्यात अशांतता वाढली आहे. चकमकीच्या बातम्या सातत्याने येत आहेत.

Web Title: J-K: attempt to enter in india from Jammu and Kashmir's Kupwara; 3 terrorists killed