शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

वनोद्यानाचे ते हस्तांतर नव्हेच...

By admin | Updated: January 6, 2015 00:05 IST

नाशिक : पांडवलेणीच्या पायथ्याशी असलेल्या वन खात्याच्या जागेवर खासगी प्रायोजकाच्या माध्यमातून जागा देण्यासंदर्भात महसूलमंत्र्यांनी केवळ मान्यता दिली आहे; वन खात्याची जागा हस्तांतरित करण्यास मान्यता दिलेली नाही, असे वन खात्याच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

नाशिक : पांडवलेणीच्या पायथ्याशी असलेल्या वन खात्याच्या जागेवर खासगी प्रायोजकाच्या माध्यमातून जागा देण्यासंदर्भात महसूलमंत्र्यांनी केवळ मान्यता दिली आहे; वन खात्याची जागा हस्तांतरित करण्यास मान्यता दिलेली नाही, असे वन खात्याच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.पांडवलेणीच्या पायथ्याशी असलेले वनोद्यान प्रायोजकामार्फत विकसित करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तत्कालीन वनमंत्री पतंगराव कदम यांच्याकडे परवानगी मागितली होती; परंतु त्यांनी अशाप्रकारे कोठेही वनउद्यानाची जागा दिल्याची माहिती घ्यावी लागेल असे सांगून हा विषय टाळला होता. त्यामुळे गेल्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी जाहीर सभेत कदम यांच्यावर टीका केली होती. दरम्यान, सोमवारी मुंबईत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या दालनात बैठक झाली. यावेळी वनउद्यानाचे हस्तांतराबाबत चर्चा झाल्याचे पालिकेने कळविले आहे. प्रत्यक्षात ते हस्तांतर नाही. किंबहुना वन खात्याच्या जागा अशाप्रकारे हस्तांतरित होऊच शकत नाही. त्यामुळे महापालिका वा एखाद्या प्रायोजकाकडे हस्तांतरित करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मुनगंटीवार यांनी त्रिपक्षीय करार करण्यास मान्यता दिली आहे, ती केवळ त्यावर झाडे किंवा तत्सम कामे करण्यासाठी परवानगी म्हणूनच. वन खात्याची जागा हस्तांतरित करणे जवळपास अशक्य आहे. केवळ विकासकामासाठी त्रिपक्षीय करार यापूर्वी नाशिकमध्ये सॅमसोनाईट कंपनीशीही करण्यात आला आहे. ते अधिकार केवळ केंद्रालाचवन खात्याच्या जागा हस्तांतरणाचे अधिकार केवळ केंद्र शासनाला आहेत. कोणत्याही जागेची निकड असेल तर राज्य शासन केंद्र शासनाला प्रस्ताव पाठविते. केंद्र शासन याबाबत जिल्हाधिकार्‍यांकडे अहवाल मागविते. त्यांनी वन खात्याची जागा संबंधित प्रकल्पाला देण्याशिवाय पर्याय नाही असा अहवाल दिल्यानंतरच केंद्र निर्णय घेऊ शकते. वन खात्याच्या जागेत झाडे लावण्यासाठी त्रिपक्षीय करार होऊ शकतो. अशा जागेत सीमेंटचे कोणतेही बांधकाम करता येत नाही.- अरविंद पाटील, वनसंरक्षक, नाशिक