शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

इस्रो देणार 'लय भारी' व्हॅलेंटाईन गिफ्ट; संकटग्रस्तांचे जीव वाचणार, पाकला झटका बसणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 19:30 IST

इस्रोचा उपग्रह संरक्षण, आपत्ती व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावणार

पुढील महिन्यात जगभरासह भारतात व्हॅलेंटाईन डे साजरा केला जाईल. त्यामुळे फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात कित्येक जण त्यांच्या प्रेमाची कबुली देतील. भारतीय अंतराळ संशोधन संस्थादेखील (इस्रो) याला अपवाद नसेल. देशाच्या संरक्षणात, आपत्ती व्यवस्थानात उपयोगी ठरणारं असं अमूल्य गिफ्ट इस्रो याच कालावधीत देशाला देईल. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात इस्रोकडून जीआयसॅट-१ (GiSAT-1) उपग्रह अवकाशात सोडणार आहे. जीआयसॅट-१ उपग्रह जिओस्टेशनरी ऑर्बिटमध्ये एकाच ठिकाणी थांबून देशाच्या सीमांची टेहळणी करेल. हा उपग्रह दर अर्ध्या तासाला देशाचा एक फोटो पाठवेल. यामुळे पाकिस्तान आणि चीनला लागून असलेल्या सीमांवरील हालचालींची माहिती सतत मिळत राहील. पाकिस्तानमधून सतत भारतीय हद्दीत घुसखोरींचे प्रयत्न सुरू असतात. त्यावर अंतराळातून जीआयसॅट-१ रुपी तिसरा डोळा लक्ष ठेवेल. जीआयसॅट-१ मध्ये पाच प्रकारचे कॅमेरे लावण्यात आले आहेत. इस्रो जीआयसॅट मालिकेतले दोन उपग्रह अवकाशात सोडणार आहे. जीआयसॅट-१ च्या प्रक्षेपणानंतर इस्रो जीआयसॅट-२ अवकाशात पाठवेल. जीआयसॅट-१चं प्रक्षेपण १५ जानेवारीला करण्यात येणार होतं. इस्रोनं ही तारीख जाहीरदेखील केली होती. मात्र काही तांत्रिक अडचणी आल्यानं हे प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आलं. आंध्रप्रदेशातल्या सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्रातून जीआयसॅट-१ चं प्रक्षेपण करण्यात येईल. या मोहिमेत जीएसएलव्ही-एके२ प्रक्षेपक म्हणून काम करेल. जीआयसॅट-१ मध्ये कार्टोसेट उपग्रहात अतिशय सामर्थ्यशाली पॅनक्रोमॅटिक कॅमेरा लावण्यात आला आहे. हा कॅमेरा अर्ध्या तासानं देशाचा फोटो काढेल. याशिवाय उपग्रहातले बाकीचे कॅमेरेदेखील सतत फोटो टिपून ते इस्रोला पाठवतील. जीआयसॅट-१ केवळ दिवसाच फोटो काढू शकतो. रात्रीचे फोटो टिपण्यासाठी इस्रो जीआयसॅट मालिकेतला दुसरा उपग्रह अवकाशात सोडणार आहे.  

 

टॅग्स :isroइस्रोchinaचीनPakistanपाकिस्तान