शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

नवी कार घेणाऱ्यांसाठी बदलू शकतात नियम; पाहा काय होणार बदल

By जयदीप दाभोळकर | Updated: January 25, 2021 16:55 IST

पाहा पारदर्शकता राहावी म्हणून काय होऊ शकतात बदल

ठळक मुद्देनियम बदलल्यास ग्राहकांना फायदा होण्याची शक्यताविमा प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी समितीनं केल्या शिफारसी

नवी कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर आता एक नियम बदलण्याची शक्यता आहे. वाहनाची किंमत आणि विमा प्रिमिअमची रक्कम ही आता निरनिराळ्या चेकद्वारे द्यावी लागू शकते. विमा नियामक आणि विकास प्राधिकरणानं एका मोटर विमा सेवा समितीच्या मार्गदर्शक तत्त्वांची समीक्षा केल्यानंतर केलेल्याच्या शिफारसी स्वीकारल्या तर हा कायदा लागू होऊ शकतो. प्रक्रिया तर्कसंगत करण्याच्या उद्देशाने आयआरडीएने २०१७ मध्ये एमआयएसपी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. याव्यतिरिक्त विक्रेत्यांकडून विकला जाणारा वाहन विमा १९३८ च्या कायद्यांतर्गत आणणं हादेखील होता. एमआयएसपी म्हणजे विमा कंपनीद्वारे नियुक्त केलेला वाहन विक्रेता किंवा विमा मध्यस्थाद्वारे जो विक्री केलेल्या वाहनांसाठी विमा सेवादेखील प्रदान करतो. नियामक मंडळानं २०१९ मध्ये MISP मार्गदर्शक तत्त्वांच्या समीक्षेसाठी एक समिती तयार केली होती. समितीनं एमआयएसपीद्वारे मोटार विमा व्यवसायाला सुव्यस्थितरित्या सुरू ठेवण्यासाठई काही शिफारसी केल्या होत्या. समितीनं अन्य मुद्द्यांव्यतिरिक्त वाहम विमा पॉलिसी तयार करताना ग्राहकांकडून प्रिमियम घेतानाच्या व्यवहाराचीदेखील समीक्षा केली होती.पारदर्शकतेचा अभावसद्य स्थितीत ग्राहकांकडून पहिल्यांदा वाहन खरेदी केल्यानंतर विमा प्रिमिअमच्या रकमेबाबत पारदर्शकतेचा अभाव असल्याचं समितीला दिसून आलं. यामध्ये ग्राहकाकडून एकाच चेकद्वारे रक्कम भरली जाते. एमआएसपी आपल्या खात्यातून विमा कंपन्यांना पैसे देतात. त्यामुले ग्राहकांना त्यांनी दिलेला विमा प्रिमिअम किती आहे याची माहिती मिळत नाही. कारण तो वाहनाच्या किंमतीतच एकत्र करून ग्राहकांकडून घेतला जातो, असंही समितीनं म्हटलं आहे. ग्राहकांना विम्याची रक्कम माहित नसल्यामुळे पारदर्शकतेची कमतरता ही पॉलिसीधारकांच्या हिताची नाही. याव्यतिरिक्त यात कोणत्या गोष्टी कव्हर केल्या जाणार आहेत आणि कोणत्या नाही याची माहितीही ग्राहकांना मिळत नाही. यासाठी वाहन खरेदी करताना ग्राहकांनी थेट विमा कंपन्यांनाच विम्याची रक्कम दिली पाहिजे. एमआयएसपी ग्राहकांकडून पैसे आकारून आपल्या खात्यातून त्यांनी विमा कंपन्यांना पैसे देऊ नये, अशी शिफारसही समितीद्वारे करण्यात आली आहे. 

टॅग्स :carकारMONEYपैसा