शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 23:53 IST

America Entry in Israel Iran War: कतार येथील अमेरिकन लष्करी तळांवर इराणे क्षेपणास्त्र हल्ले केल्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संरक्षण अधिकाऱ्यांसोबत एक बैठक बोलावल्याचे म्हटले जात आहे.

America Entry in Israel Iran War:इस्रायल-इराण यांच्यात पेटलेल्या युद्धात अमेरिकेने उडी घेतली. इराणचा आण्विक कार्यक्रम रोखण्यासाठी इस्रायलने सुरू केलेल्या हल्ल्यांदरम्यान अमेरिकेने इराणच्या तीन आण्विक केंद्रांवर बंकर बस्टर बॉम्बनी हल्ला केला. यानंतर आता इराणने कतारमधील अमेरिकेच्या तळांवर ६ क्षेपणास्त्रे डागली आहेत. यानंतर आता कतार, बहरीन, कुवेत यांनी आपले एअरस्पेस बंद केले आहेत. इराणने प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यांमुळे आखाती देशांतील तणाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एअर इंडिया आणि इंडिगो या विमान कंपन्यांनी आखाती देशात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

मध्य पूर्वेतील सध्याची परिस्थिती आणि कतारने एअर स्पेस बंद केल्यामुळे एअर इंडिया एक्स्प्रेसने कोचीहून दोहाला जाणारे विमान मस्कतला वळवले आहे आणि कन्नूरहून परत आणले आहे. कतारला जाणारे इतर कोणतेही विमान आमच्याकडे नाही. एअर इंडिया एक्स्प्रेसचे कतारमध्येही कोणतेही विमान नाही. आम्ही परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करत आहोत. संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन आमचे प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेऊ. आमच्या नियंत्रणाबाहेरील परिस्थितीमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. एअर इंडियाच्या प्रवाशांना विनंती करतो की, त्यांनी रिअल टाइम अपडेटसाठी त्यांचे संपर्क तपशील अपडेट करावेत. प्रवास रद्द आणि परतफेड पर्यायांसाठी अधिकृत संकेतस्थळांवर त्यांची फ्लाइट स्थिती तपासावी, असे आवाहन एअर इंडियाच्या प्रवक्त्यांकडून करण्यात आले आहे. 

मध्य पूर्वेतील बदलत्या परिस्थिती लक्षात घेता, काही उड्डाणांना विलंब किंवा वळवण्याची शक्यता

मध्य पूर्वेतील बदलत्या परिस्थिती लक्षात घेता, काही उड्डाणांना विलंब किंवा वळवण्याची शक्यता आहे. सुरक्षित आणि सुसंगत हवाई क्षेत्रात ऑपरेशन्स राहतील, याची खात्री करण्यासाठी हे पाऊल उचलले केले जात आहे. आम्ही फ्लाइटची स्थिती नियमितपणे तपासण्याची शिफारस करतो. तुमच्या फ्लाइटवर परिणाम झाला तर आमच्या वेबसाइटद्वारे पर्याय शोधता येतील. आम्ही संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधून परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करत आहोत, असे इंडिगोकडून सांगितले जात आहे. 

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे संरक्षण अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेत असल्याचे सांगितले जात आहे. कतार येथील अमेरिकेचा तळ मध्य पूर्वेतील अमेरिकन लष्करी कारवायांसाठी एक प्रमुख केंद्र म्हणून काम करतो, अशी माहिती देण्यात आली आहे. इराणने प्रत्युत्तरादाखल डागलेल्या क्षेपणास्त्रांचे आवाज कतारची राजधानी दोहा येथे ऐकू आले, असे प्रत्यक्षदर्शींनी रॉयटर्सला सांगितले.

 

टॅग्स :IranइराणAmericaअमेरिकाQatarकतारIsraelइस्रायल