शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
2
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
3
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
5
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
6
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
7
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
8
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
9
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
10
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
11
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
12
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
13
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
14
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
15
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
16
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
17
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
18
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
19
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

राम मंदिर उभारणीचा 'बदला' घेण्याचा प्लॅन, हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट आखतोय पाकिस्तान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 13:56 IST

अलर्टनुसार, दाऊद इब्राहिम गँगमधील सदस्यांचा वापर करून पाकिस्तान हल्ल्याचा कट आखत आहे. पाकिस्तान भाजपा, विश्व हिंदू परिषद (व्हीएचपी) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (आरएसएस) संबंधित नेत्यांची हत्या करून राम मंदिर उभारणीचा बदला घेण्याचा कट आखत आहे.

ठळक मुद्देपाकिस्तान भाजपा, विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित नेत्यांची हत्या करण्याचा कट आखत आहे.गुजरात एटीएसने रात्री उशिरा पकडला शार्प शूटरयासंदर्भात, गुप्तचर संस्थांकडून तीन राज्यांना अलर्ट केले आहे. 

नवी दिल्ली - एकीकडे अयोध्येत राम जन्मभूमीवर मंदिर उभारणीला सुरूवात झाली आहे. तर दुसरीकडे पाकिस्तान मोठा करट आखत असल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानराम मंदिर उभारणीचा बदला घेण्यासाठी भारतातील हिंदू नेत्यांवर हल्ला करण्याचा कट आखत आहे. यासंदर्भात, गुप्तचर संस्थांकडून तीन राज्यांना अलर्ट केले आहे. 

टाइम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या शुक्रवारी इंटेलिजेंस ब्यूरोने वेगवेगळ्या राज्यांना अलर्ट जारी करताना म्हटले होते, की पाकिस्तान भारतात राहणाऱ्या आंतरराष्ट्रीय गँगशी संबंधित असलेल्या आरोपींचा वापर करून, हिंदू नेत्यांना मारण्याचा कट आखत आहे. टाइम्स नाऊकडे या अलर्टची कॉपी असल्याचेही समजते.

आरएसएस आणि भाजपा नेते निशाण्यावर -अलर्टनुसार, दाऊद इब्राहिम गँगमधील सदस्यांचा वापर करून पाकिस्तान हल्ल्याचा कट आखत आहे. पाकिस्तान भाजपा, विश्व हिंदू परिषद (व्हीएचपी) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (आरएसएस) संबंधित नेत्यांची हत्या करून राम मंदिर उभारणीचा बदला घेण्याचा कट आखत आहे. या अलर्टनंतर या राज्यांतील गुप्तचर संस्थाही अलर्ट झाल्या आहेत. यानंतर गुजरातमधील दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) भाजपा प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी गृह राज्यमंत्री गोरधन जडफिया यांच्या हत्येच्या कथित कटाचा भांडाफोड करत एका शार्प शूटरला अटकही केली होती.

गुजरात एटीएसने रात्री उशिरा पकडला शार्प शूटर -गुजरात एटीएसच्या पथकाने बुधवारी रात्री उशिरा अहमदाबादच्या रिलीफ रोडवरील हॉटेल व्हिनसच्या रूम नंबर 105 मधून रात्री दीड वाजता छापा मारला होता. यावेळी रूममध्ये लपलेल्या आरोपी इरफान शेख उर्फ कालियाने (24) त्यांच्यावर दोन वेळा फायरिंग केली. मात्र यात कुणीही जखमी झाले नाही. इरफान मुंबईतील चेंबूर येथील रहिवासी आहे. एटीएसच्या वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शार्प शूटरला अंडरवर्ल्ड डॉन दाउद इब्राहिमच्या निकटवर्तीय असलेल्या गँगस्टर छोटा शकीलने पाठवले होते. 

नेत्यांची सुरक्षितता वाढवली - जडफिया 2002च्या दंगलीवेळी गृह राज्यमंत्री होते. यापूर्वी  गुजरातचे माजी गृह राज्यमंत्री हरेन पांड्या यांचीही मार्च 2003 मध्ये हत्या झाली होती. आता त्या प्रमाणेच, पाकिस्तान राम मंदिर उभारणीचा बदला घेण्याचा कटा आखत असल्याचे मानले जाते आहे. यानुसारच आता हिंदुत्ववादी नेत्यांच्या सुरक्षिततेत वाढ करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या -

 

उद्धव ठाकरे 'पुत्रमोह झालेले धृतराष्ट्र'; भाजपाच्या बड्या नेत्याचा निशाणा, संजय राऊतांना दिला असा इशारा

'हे' गाणं ऐकल्यानंतर अनेकांनी केल्या होत्या आत्महत्या, तब्बल 62 वर्षे घालण्यात आली होती बंदी!

CoronaVirus Vaccine : पाकिस्तान कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील परीक्षणासाठी तयार!

CoronaVirus News: लोकांना संक्रमित करण्यासाठी अमेरिका तयार करतोय नवा कोरोना व्हायरस!

CoronaVirusVaccine : रशियन कोरोना लसीची अमेरिकेने उडवली खिल्ली, म्हणाले - माकडा लायकही नाही!

CoronaVaccine: पश्चिमेकडील देशांना रशियाचं थेट प्रत्युत्तर; सांगितलं, 'या'मुळे खास आहे Sputnik V लस

CoronaVaccine: रशियन कोरोना लसीला जगभरातून जबरदस्त मागणी, 20 देशांकडून मिळाली 1 अब्ज डोसची ऑर्डर

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरPakistanपाकिस्तानGujaratगुजरातPoliceपोलिस