शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

मुलांची गर्दी रोखण्यासाठी मुलींना लायब्ररीमध्ये प्रवेशबंदी - कुलगुरुंचे अजब तर्क

By admin | Updated: November 11, 2014 13:17 IST

मुलींमुळे कॉलेजच्या लायब्ररीतील मुलांची गर्दी चार पटीने वाढण्याची शक्यता आहे असे अजब तर्क मांडत अलीगढ विद्यापीठाच्या कुलगुरुंनी मुलींना विद्यापीठातील लायब्ररीत प्रवेश द्यायला नकार दिला.

ऑनलाइन लोकमत

अलीगढ, दि. ११ - मुलींमुळे कॉलेजच्या लायब्ररीतील मुलांची गर्दी चार पटीने वाढण्याची शक्यता आहे असे अजब तर्क मांडत अलीगढ विद्यापीठाच्या कुलगुरुंनी मुलींना विद्यापीठातील लायब्ररीत प्रवेश द्यायला नकार दिला. कुलगुरुंच्या या विधानावार महिला संघटनांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. 
अलीगढ मुस्लिम विद्यापीठाची मौलाना आझाद ही प्रशस्त लायब्ररी असून यामध्ये सुमारे १३०० विद्यार्थी बसून अभ्यास करु शकतात. पण विद्यापीठांतर्गत येणा-या महिला महाविद्यालयातील मुलींना या लायब्ररीचे सदस्यत्व दिले जात नाही. महिला महाविद्यालयातील लायब्ररीपेक्षा मौलाना आझाद लायब्ररीमध्ये विपूल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे.  गेल्या अनेक वर्षांपासून महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनी लायब्ररीमध्ये  प्रवेश द्यावा अशी मागणी करत आहेत. 
सोमवारी कॉलेजमधील विद्यार्थी संघटनेच्या शपथविधी समारंभात विद्यापीठाचे कुलगुरु लेफ्ट. जनरल जमीरुद्दीन शाह यांनी विद्यार्थिनींना लायब्ररीमध्ये प्रवेश का नाकारला जातो याचे वादग्रस्त उत्तर दिले. शाह म्हणतात, विद्यार्थिनींमुळे लायब्ररीतील मुलांची गर्दी वाढेल. यानंतर कुलगरुंना बहुधा त्यांची चूक लक्षात आली व 'खरंतर प्रश्न अनुशासनतेचा नसून जागेचा आहे' अशी सारवासारव त्यांनी केली. 
विशेष म्हणजे महाविद्यालयाच्या प्राचार्या नइमा गुलरेज यांनीही कुलगुरुंच्या सुरात सुर मिसळले. त्या म्हणाल्या,  विद्यार्थिनींना विद्यापीठाच्या लायब्ररीमध्ये प्रवेश देण्याची मागणी आम्ही समजू शकतो. मात्र मुलींना लायब्ररीमध्ये प्रवेश दिला तर गर्दी वाढेल आणि कॉलेजमधील शिस्त धोक्यात येईल.  
कुलगुरुंच्या या वादग्रस्त विधानाला महिला महाविद्यालयाच्या ग्रंथपालांनाही पाठिंबा दिला.  'आम्ही कॉलेजमधील विद्यार्थिंनींच्या मागणीनुसार मौलाना आझाद लायब्ररीमधील पुस्तकं उपलब्ध करुन देतो, त्यामुळे मुलींचे उद्देश पूर्ण होतो' असे या ग्रंथपालांची म्हणणे आहे. 'आम्हाला लायब्ररीचे सदस्यत्व मिळणे गरजेचे आहे, जागा नसेल तर आम्ही फक्त पुस्तक घेऊन परत येऊ असे एका विद्यार्थिनीने सांगितले. दरम्यान, कुलगुरुंच्या या वादग्रस्त विधानावर महिला संघटना व राजकीय पक्षांनी नाराजी दर्शवली आहे.