एटीएम व्यवहारांची माहिती मोबाईलवर मिळेल हिंदीतून

By Admin | Updated: August 20, 2014 22:53 IST2014-08-20T22:53:00+5:302014-08-20T22:53:00+5:30

एटीएमवरून पैसे काढल्यानंतर तुमच्या खात्यात किती पैसे शिल्लक आहेत याची माहिती मोबाईल फोनवर हिंदी किंवा अन्य प्रादेशिक भाषांत मिळू शकेल.

Information about ATM transactions will be available on mobile | एटीएम व्यवहारांची माहिती मोबाईलवर मिळेल हिंदीतून

एटीएम व्यवहारांची माहिती मोबाईलवर मिळेल हिंदीतून

नवी दिल्ली : एटीएमवरून केलेल्या व्यवहारांची माहिती तुम्हाला येत्या काही काळात तुमच्या मोबाईल फोनवर हिंदी भाषेत मिळू शकेल. एटीएमवरून पैसे काढल्यानंतर तुमच्या खात्यात किती पैसे शिल्लक आहेत याची माहिती मोबाईल फोनवर हिंदी किंवा अन्य प्रादेशिक भाषांत मिळू शकेल.
अॅप्लिकेशन भाषा व्यवस्थापनातील आघाडीची कंपनी ‘लिंग्वानेक्स्ट’ने आज या संदर्भातील मोबाईल अॅप्लिकेशनचे उत्पादन ‘लिंग्वाफाई डॉट मोबाईल’ बाजारात आणले त्यावेळी ही माहिती देण्यात आली. लिंग्वानेक्स्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश सहस्रबुद्धे यांनी येथे आयोजित कार्यक्रमात सांगितले की, या संदर्भात आमची काही बँका आणि एटीएम निर्मात्यांशी चर्चा सुरू आहे. ग्राहकांना त्यांनी एटीएमवर केलेल्या व्यवहारांची माहिती मोबाईल फोनवर हिंदी भाषेतून मिळण्यासाठी आम्हाला बँकेचे नेटवर्क व एटीएम मशीनमध्ये सॉफ्टवेअर टाकावे
लागेल. 
सार्वजनिक क्षेत्रतील बहुतांश बँकांसाठी आम्ही याआधीच काम करीत आहोत. त्यात पासबुक स्थानिक भाषेत प्रकाशित होणो, बँक स्टेटमेंट व अन्य कामांचा समावेश आहे; परंतु मोबाईल, एटीएम आणि बँकेच्या नेटवर्क स्तरावर हे काम व्हायचे आहे. या वर्षअखेर ही सेवा काही बँकांमध्ये सुरू होण्याची शक्यता असल्याचे सहस्रबुद्धे यांनी सांगितले; परंतु त्यांनी बँकांची नावे सांगितली नाहीत. (वृत्तसंस्था)

 

Web Title: Information about ATM transactions will be available on mobile