शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: कुणाचा काउंटरवर चढून थयथयाट, तर कुणाला अश्रू अनावर... IndiGo पाहतंय प्रवाशांचा अंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 13:35 IST

IndiGo flights cancelled, Travellers angry crying: विमानतळावर काहींना भावना अनावर झाल्या, तर काहींना संताप अनावर झाल्याचे दिसले.

IndiGo flights cancelled, Travellers angry crying: इंडिगोविमानसेवेचा सावळा गोंधळ अद्यापही सुरुच आहे. इंडिगोच्या गचाळ व्यवस्थापनाने गेल्या पाच दिवसांपासून प्रवाशांना प्रचंड त्रस्त करून सोडले आहे. विमान रद्द झाल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी, निराशा आणि संतापाचे चित्र आहे. विमानतळावर काहींना भावना अनावर झाल्याचे दिसून आले. तर काहींना संताप अनावर झाल्याचे दिसले. एका विदेशी महिलेचा राग इतका वाढला की तिने थेट विमान कंपनीच्या काउंटरवर धाव घेतली आणि तिच्या विमान रद्द करण्याबाबत जाब विचारला.

विदेशी महिलेचा काउंटरवर चढून आक्रोश

एक विदेशी महिला काउंटरची खिडकी पकडून अनवाणी पायांनी ती थेट काउंटरवर चढली. तिने तेथून ओरडून होणाऱ्या गैरसोयीबाबत आक्रोश केला आणि विमान कंपनीकडे जाब विचारला.  काउंटरवरील ग्राउंड स्टाफने तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. महिलेने ओरडून सांगितले की तिचे सर्व सामान तिच्या बॅगेत भरलेले होते. तिच्याकडे घालण्यासाठी अतिरिक्त कपडे नव्हते. तिने इतर त्रस्त प्रवाशांकडून आधारही मागितला. विमान कंपनीकडून मूलभूत सुविधा मिळू शकल्या नाहीत. अडकून पडल्यामुळे संतप्त महिलेने अन्न-पाण्याचीही मागणी केली. पण तिला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.


काहींना भावना अनावर, रडूही कोसळलं

शनिवारी एकूण ४५२ इंडिगो उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. यामध्ये हैदराबादला जाणारी ६९, दिल्लीला जाणारी १०६, मुंबईला जाणारी १०९, चेन्नईला जाणारी ४८, अहमदाबादला जाणारी १९, हैदराबादला जाणारी ६९, जयपूरला जाणारी ६, चंदीगडला जाणारी १० आणि विशाखापट्टणमला जाणारी २० उड्डाणे समाविष्ट आहेत. विमानतळ अधिकाऱ्यांच्या मते, शनिवारी मध्यरात्री १२ ते सकाळी ६ या वेळेत एकट्या अहमदाबाद विमानतळावर येणारी सात आणि जाणारी बारा उड्डाणे रद्द करण्यात आली. सेवा विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांच्या लांब रांगा, गर्दीच्या काउंटर आणि पर्यायी प्रवास पर्यायांच्या अभावामुळे प्रवाशांमध्ये निराशा वाढली. शनिवारी सकाळी अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरही मोठ्या प्रमाणात व्यत्यय आला. लांब रांगा आणि वारंवार रद्द झालेली उड्डाणे यामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे एका तरुणीला अश्रू अनावर झाले.

इंडिगो पाहतंय प्रवाशांचा अंत

देशभरात इंडिगोला ऑपरेशनल कारणांचा फटका बसल्याचे सांगितले जात आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) त्यांचे फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन (FDTL) आदेश तात्काळ स्थगित केल्याने ही समस्या उद्भवली आहे. देशभरात अनेक दिवसांचा विलंब आणि रद्द यानंतर हे नियामक निलंबन आले. याचा परिणाम इंडिगोच्या उड्डाण ऑपरेशन्सवर झाला आहे, ज्यामुळे सर्व क्षेत्रातील प्रवाशांना मोठी गैरसोय होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : IndiGo chaos: Passengers' fury erupts over flight cancellations, tears flow.

Web Summary : IndiGo faces passenger fury after mass flight cancellations. A foreign woman climbed a counter in protest, while others wept due to travel disruptions. Hundreds of flights were grounded, causing widespread frustration and demands for basic amenities amidst the chaos at airports like Ahmedabad.
टॅग्स :IndigoइंडिगोairplaneविमानAirportविमानतळ