IRCTC: ‘आरएसी’त बर्थ न मिळाल्यास प्रवाशांना पैसे परत द्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 06:00 IST2026-02-06T05:59:28+5:302026-02-06T06:00:02+5:30
Indian Railways RAC refund news: रेल्वेच्या 'आरएसी' तिकीटावर प्रवास करणाऱ्यांसाठी लोक लेखा समितीकडून महत्त्वाची शिफारस करण्यात आली आहे.

IRCTC: ‘आरएसी’त बर्थ न मिळाल्यास प्रवाशांना पैसे परत द्या!
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली: ‘आरएसी’ श्रेणीत तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांना पूर्ण बर्थ मिळाला नाही तर त्यांच्याकडून पूर्ण भाडे घेणे योग्य नाही. त्यांना भाड्याची काही रक्कम परत करावी, अशी शिफारस लोक लेखा समितीने केली आहे.
‘आरएसी’ तिकिटांसाठी पूर्ण भाडे आकारणे योग्य नाही. संबंधित प्रवाशाला चार्ट तयार झाल्यानंतर पूर्ण बर्थ मिळत नाही, असे ट्रेन्सचा वक्तशीरपणा व प्रवास वेळेसंबंधीच्या अहवालात नमूद केले आहे.
परतावा देण्यासाठी यंत्रणा तयार करावी
समितीने शिफारस करताना म्हटले आहे की, ज्यांना आरएसीमध्ये पूर्ण बर्थ मिळाला नाही, परंतु रेल्वेत बसताना पूर्ण भाडे द्यावे लागले अशा प्रवाशांना भाड्याचा अंशतः परतावा देण्यासाठी एक यंत्रणा तयार करावी.
बर्थ शेअर करावा लागू शकतो
आरएसी तिकिटासाठी पूर्ण भाडे घेतले जाते. वास्तविक त्या प्रवाशाचे तिकीट आरएसीच राहू शकते. त्याला आरएसी तिकीट असलेल्या प्रवाशासोबत बर्थ शेअर करावा लागू शकतो. तरीही दोन्ही प्रवाशांकडून पूर्ण भाडे घेतले जाते.