शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

ऊर्जेची गरज भागविण्यासाठी भारत मॉरिशसला सहकार्य करणार

By admin | Updated: March 22, 2017 02:24 IST

मॉरिशसच्या ऊर्जाविषयक गरजा भागविण्यासाठी भारत सतत पाठिंबा देत राहील, असे आश्वासन पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान

नवी दिल्ली : मॉरिशसच्या ऊर्जाविषयक गरजा भागविण्यासाठी भारत सतत पाठिंबा देत राहील, असे आश्वासन पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मंगळवारी मॉरिशसचे उपपंतप्रधान शोकुताली सोधून यांना दिले.प्रधान यांनी मंगळवारी नवी दिल्ली येथे सोधून यांची भेट घेऊन द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा केली. भारताचा सार्वजनिक उपक्रम असलेली हायड्रोकार्बन क्षेत्रातील मंगलोर रिफायनरी अ‍ॅण्ड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड (एमआरपीएल) ही रिफायनरी २००६ पासून मॉरिशसला पेट्रोलियम पदार्थांचा पुरवठा करीत आहे.हे दोन्ही देश तेल आणि वायू क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्य अधिक वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मॉरिशसची ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्यासह आवश्यक तेल आणि वायू क्षेत्रांतील पायाभूत सुविधांच्या विकासाच्या माध्यमातून मॉरिशसला पेट्रोलियम हब बनविण्याच्या भारताच्या कटिबद्धतेचा प्रधान यांनी या भेटीत पुनरुच्चार केला. यावेळी सोधून आणि प्रधान यांनी हायड्रोकार्बन क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्य बळकट करण्याच्या दिशेने काम करण्याची इच्छा व्यक्त केली.सोधून हे हायड्रोग्राफीवरील संयुक्त समितीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आणि भारत-मॉरिशस द्विपक्षीय सागरी सहकार्य अधिक बळकट बनविण्यासाठी तीन दिवसांच्या भारत दौऱ्यार आले आहेत. भारत आणि मॉरिशस यांचे प्राचीन काळापासूनचे सांस्कृतिक आणि आर्थिक संबंध आहेत आणि हे द्विपक्षीय संबंध अलीकडच्या काळात अधिकाधिक दृढ बनत चालले आहेत. (वृत्तसंस्था)