शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
3
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
4
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
5
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
6
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
7
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
8
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
10
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
11
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
12
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
13
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
14
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
15
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
16
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
17
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
18
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
19
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
20
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

देश हादरला! भारतात कोरोना रुग्णांनी ओलांडला पाच लाखांचा टप्पा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 10:12 AM

सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात सापडले असून दिल्लीचा दुसरा क्रमांक आहे. महाराष्ट्रात ९ मार्च रोजी कोरोनाचा पहिल्या रुग्णांची नोंद झाली होती, त्यानंतर आज (शुक्रवारी) दिवसभरात तब्बल ५ हजार २४ कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर १७५ मृत्यू झाले.

नवी दिल्ली: देशात लॉकडाऊन उठविण्याचा दुसरा टप्पा तोंडावर आला असताना कोरोनाच्या आकडेवारीने भयभीत केले आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे नवे 18552 रुग्ण सापडल्याने देशभरातील आकडेवारीने तब्बल 5 लाखांचा टप्पा पार केला आहे. धक्कादायक म्हणजे हा वेग प्रचंड आहे. 

गेल्या 24 तासांत विक्रमी वाढ पहायला मिळालेली असताना 384 मृत्यूही नोंदविले गेले आहेत. देशात सध्या 197387 रुग्ण उपचार घेत आहेत. तर एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 508953 वर गेला आहे. तर 295881 रुग्ण बरे झाले आहेत. देशात एकूण मृतांचा आकडा 15685 झाला आहे. 

सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात सापडले असून दिल्लीचा दुसरा क्रमांक आहे. महाराष्ट्रात ९ मार्च रोजी कोरोनाचा पहिल्या रुग्णांची नोंद झाली होती, त्यानंतर आज (शुक्रवारी) दिवसभरात तब्बल ५ हजार २४ कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर १७५ मृत्यू झाले. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या १ लाख ५२ हजार ७६५ झाली असून बळींचा आकडा ७ हजार १०६ इतका झाला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२.२५ टक्के झाले असून सध्या ६५ हजार ८२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर राज्यातील मृत्यूदर ४.६५ टक्के इतका आहे. 

कोरोनाचा वेग30 जानेवारीला पहिला कोरोनाचा रुग्ण देशात सापडला होता. यानंतर 110 दिवसांनी म्हणजेच 10 मे रोजी ही संख्या 1 लाखावर गेली होती. यानंतर कोरोनाच्या संक्रमणाचा वेग एवढा वाढला की, केवळ 15 दिवसांतच हा आकडा दोन लाखावर गेला. यानंतर हा आकडा तीन लाख होण्यासाठी 10 दिवस लागले. हा वेग आणखी वाढून 4 लाखांवर हा आकडा जाण्यासाठी 8 दिवस लागले. तर चार लाखांवरून पाच लाखांचा टप्पा गाठण्यासाठी केवळ 6 दिवसांचा कालावधी लागला आहे. 

याचाच अर्थ आता पुढील सहा लाखांचा टप्पा ओलांडण्यासाठी सहा दिवसांपेक्षा कमी कालावधी लागणार आहे. जर असाच वेग सुरु राहिला तर पुढील आठवड्यातच भारत रशियाला मागे टाकून जगातील तिसरा सर्वाधिक कोरोनाग्रस्त देश बनणार आहे. 

दिलासादायक काय?पाच लाखांचा टप्पा ओलांडण्यासाठी भारताला 149 दिवस लागले आहेत. अन्य देशांच्या तुलनेत भारतातील कोरोनाचा वेग कमी आहे. अमेरिकेमध्ये सर्वात वेगाने प्रसार झाला होता. केवळ 82 दिवसांत अमेरिकेमध्ये पाच लाखांचा टप्पा ओलांडला होता. महत्वाचे म्हणजे भारत लोकसंख्येचा बाबतीत जगातील दुसरा मोठा देश आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

बाबो! लग्नाच्या ९ वर्षांनंतर समजले पत्नी 'पुरूष' आहे; पतीला बसला मानसिक धक्का

India China FaceOff: आता चीनच्या पाणबुड्यांचे हिंदी महासागरावर लक्ष; भारतासाठी धोक्याचे

Unlock 2 ची तयारी सुरु; शाळा, कॉलेज सुरु होणार? मोदी लवकरच निर्णय घेणार

पाकिस्तानकडून युद्धाची तयारी? POK मध्ये हॉस्पिटलांचे 50 टक्के बेड केले आरक्षित

CoronaVirus: 40 वर्षांपूर्वीच भारताकडे कोरोनाचे रामबाण औषध? 'आयुष'ची चाचणीला मंजुरी

चीनच नाही, अमेरिकाही विश्वासघातकी! एकेकाळी भारतावरच हवाई हल्ल्याचे आदेश दिले होते

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक