शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 20:53 IST

India Turkey Relations: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीला भारताने चांगलाच दणका दिला.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीला भारताने चांगलाच दणका दिला. भारताने देशांतील प्रमुख विमानतळांवर ग्राउंड हँडलिंग सेवा देणारी तुर्की कंपनी सेलेबीची सुरक्षा मंजुरी तात्काळ रद्द केली. राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आल्याचे ब्युरो ऑफ एव्हिएशन सिक्युरिटीकडून स्पष्ट करण्यात आले.

भारत आणि पाकिस्तानमधील अलिकडच्या लष्करी संघर्षादरम्यान तुर्कीने उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दिला. यामुळे भारत आणि तुर्कीमधील संबंधांमध्ये पुन्हा एकदा कटुता निर्माण झाली. तुर्कीला धडा शिकवण्यासाठी भारतीय व्यापाऱ्यांनी तुर्कीच्या वस्तूंवर बहिष्कार टाकला. याचबरोबर या दोन्ही देशात जाणाऱ्या ६० टक्के भारतीय पर्यटकांनी आपले बुकिंग रद्द केली. त्यानंतर बीसीएएसने तुर्कीला आणखी एक धक्का दिला. बीसीएएसने तुर्की कंपनी सेलेबीची सुरक्षा मंजुरी तात्काळ रद्द केली.

दरम्यान, २१ नोव्हेंबर २०२२ रोजी सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला ग्राउंड हँडलिंगसाठी दिलेली सुरक्षा मंजुरी आता राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी तात्काळ रद्द करण्यात येत आहे, असे विमान वाहतूक मंत्रालयाच्या आदेशात म्हटले आहे.

तुर्की कंपनी सेलेबी भारतातील ९ प्रमुख विमानतळांवर ग्राउंड हँडलिंग सेवा पुरवायची. ही कंपनी मुंबई,कोची, टान्सजेंडर, बंगळुरू, हैदराबाद, गोवा, अहमदाबाद, चेन्नई या प्रमुख विमानतळांवर बॅगेज हँडलिंग, रॅम्प सर्व्हिस आणि कार्गो हँडलिंग सारख्या सेवा पुरवत होती. मात्र, यापुढे सेलेबी भारतातील कोणत्याही विमानतळावर सेवा देऊ शकणार नाही. देशाच्या सुरक्षेचा विचार करून हे पाऊल उचलण्यात आल्याचे भारताकडून स्पष्ट करण्यात आले.

टॅग्स :IndiaभारतIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तान